TRENDING:

Shilpa Shetty NetWorth: बॉलिवूड ते बिझनेस क्वीन! शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा

Last Updated:
Shilpa Shetty Networth: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. दोघांवर 60 कोटीच्या फसवणूकीचा आरोप आहे. ज्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
advertisement
1/7
शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. दोघांवर 60 कोटीच्या फसवणूकीचा आरोप आहे. ज्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आता या प्रकरणी शिल्पा-राजवर लुकआऊट सर्कुलर जारी करण्यात आला आहे.
advertisement
2/7
मुंबईतील एक व्यापारी, दीपक कोठारी, यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 'फ्रॉड' प्रकरणात FIR दाखल केली आहे. आरोप असा आहे की, त्यांनी ₹60.48 कोटी Best Deal TV Pvt Ltd या त्यांच्या कंपनीच्या विस्तारासाठी दिले होते, पण ते पैसे वैयक्तिक खर्चात वळवले गेले. यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
advertisement
3/7
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे एकूण किती संपत्ती आहे? आणि ती कुठून एवढा पैसा कमावते याविषयी जाणून घेऊया. शिल्पा शेट्टी यशस्वी फिल्मी करिअरनंतर बिझनेसमध्येही यशस्वी झाली.
advertisement
4/7
शिल्पा शेट्टीने 1993 साली ‘बाजीगर’ या चित्रपटातून अभिनयाच्या जगात पदार्पण केले. सुरुवातीला सहायक भूमिकेतून सुरुवात केल्यानंतर, तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.
advertisement
5/7
अभिनयासोबतच शिल्पा शेट्टीने व्यवसाय क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे. ती फिटनेस आणि योगाची मोठी समर्थक आहे. तिने स्वतःचे फिटनेस ॲप (Shilpa Shetty Wellness App) सुरू केले आहे, ज्यात योगा आणि फिटनेस टिप्स आहेत. तिने 'द ग्रेट इंडियन डाएट' नावाचे पुस्तकही लिहिले आहे.
advertisement
6/7
शिल्पाने मुंबईमध्ये 'बास्टियन' (Bastian) सारख्या रेस्टॉरंटमध्ये गुंतवणूक केली आहे. एकेकाळी ती पती राज कुंद्रासोबत आयपीएल क्रिकेट टीम ‘राजस्थान रॉयल्स’ ची सह-मालक होती.
advertisement
7/7
शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती अंदाजे 150 ते 200 कोटी रुपये आहे. तिची कमाई चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय आणि रिॲलिटी शोमधून होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shilpa Shetty NetWorth: बॉलिवूड ते बिझनेस क्वीन! शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल