TRENDING:

गं कुणी तरी येणार येणार... लग्नाच्या ५ महिन्यांनी शोभिता-नागा चैतन्यने दिली गुड न्यूज? अखेर समोर आलंच

Last Updated:
Shobhita Dhulipala Pregnancy Rumors : नागा चैतन्यने समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर शोभिता धुलिपालाशी लग्न केलं. अशातच, लग्नाच्या 5 महिन्यांनी शोभिता गरोदर असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
1/8
लग्नाच्या ५ महिन्यांनी शोभिता-नागा चैतन्यने दिली गुड न्यूज? अखेर समोर आलंच
साऊथ स्टार नागा चैतन्यने समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जवळच्या मित्रपरिवारातच त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर उधाण आलं. अशातच हे जोडपं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
advertisement
2/8
‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट २०२५’ या कार्यक्रमात नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दोघेही उपस्थित होते. शोभिता पारंपरिक साडीमध्ये दिसली. यानंतर शोभिता गरोदर असल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.
advertisement
3/8
शोभिताने तिची प्रेग्नेंसी लपवण्यासाठी सैल कपडे निवडले असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही बातमी काही वेळातच सोशल मीडियावर पसरली आणि लोकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही युजर्सनी तिला "एंटी फिट" कपडे घालण्यावरून गर्भवती असल्याचं म्हटलं.
advertisement
4/8
मात्र, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती साफ खोडून काढली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “फक्त सैलसर कपडे घालण्याचा अर्थ असा नाही की ती प्रेग्नंट आहे. हे खूप विचित्र आहे की लोक इतक्या लहानशा गोष्टींवरून मोठ्या गोष्टींचा अंदाज लावतात. सेलेब्रिटींना हे सारं वारंवार सहन करावं लागतं.”
advertisement
5/8
नागा चैतन्य आणि शोभिता दोघंही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलत नाहीत. मात्र, हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नागाने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं – “हे आयुष्य खूप सुंदर आहे. आम्हाला दोघांनाही सिनेमा आणि प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे आमचं नातं अधिक बळकट होतंय.”
advertisement
6/8
नागा पुढे म्हणाला की, “शोभिता विशाखापट्टणमची आहे आणि मलाही तो प्रदेश खूप आवडतो. जरी आम्ही वेगवेगळ्या शहरांमधून आलो असलो, तरी आमचा सांस्कृतिक पिंड जुळतो.”
advertisement
7/8
शोभितासोबतच्या नात्याआधी नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्याशी लग्न केलं होतं, परंतु ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
8/8
दरम्यान, शोभिताच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरल्या असल्या तरी, अजूनपर्यंत चैतन्य किंवा शोभिताकडून यावर कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. तसंच, कुटुंबीयांनीही या बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गं कुणी तरी येणार येणार... लग्नाच्या ५ महिन्यांनी शोभिता-नागा चैतन्यने दिली गुड न्यूज? अखेर समोर आलंच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल