अमिताभ बच्चनची हिरोईन, प्लेन क्रॅशमध्ये झाला मृत्यू; होती 7 महिन्यांची प्रेग्नंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर सगळेच हादरले आहेत. 31 वर्षांआधी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री देखील अशाच विमान अपघातात मरण पावली होती.
advertisement
1/7

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी शोक व्यक्त करत आहे. अनेक कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसलेल्या एका सुंदर अभिनेत्रीचेही विमान अपघातात निधन झालं होतं. तिच्या अचानक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला.
advertisement
2/7
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. तिचं निधन झालं तेव्हा ती फक्त 31 वर्षांची होती. तिच्या कुटुंबाला तिच्या शेवटच्या क्षणी तिचा चेहराही पाहता आला नाही. तिचा मृत्यू झाला तेव्हा ती सात महिन्यांची प्रेग्नंट होती. ही अभिनेत्री एकेकाळी अभिनय जगात रेखा आणि हेमा मालिनी यांना टक्कर देत होती.
advertisement
3/7
सूर्यवंशम चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसलेली अभिनेत्री सौंदर्या होती. तिने दक्षिण भारतीय इंडस्ट्रीत बरीच प्रसिद्धी मिळवली होती. ती तिच्या कामासाठी तसेच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती.
advertisement
4/7
तिचा सूर्यवंशम चित्रपट फ्लॉप झाला असला तरी ती घराघरात लोकप्रिय झाली. सौंदर्याने कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम सिनेमांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची छाप उमटवली होती. मात्र एका अपघाताने तिचं आयुष्य कायमचं संपवले.
advertisement
5/7
सूर्यवंशम या चित्रपटामुळे घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सौंदर्या हिचाही विमान अपघातात मृत्यू झाला. 17 एप्रिल 2004 रोजी 32 वर्षीय सौंदर्या बेंगळुरूतील जक्कूर एअरफील्डवरून करीमनगरला प्रवास करत होती.
advertisement
6/7
उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं आणि आग लागली. असे म्हटले जाते की त्यावेळी सौंदर्या गर्भवती होती. तिचा भाऊ अमरनाथ, भाजप कार्यकर्ते रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप्स हे देखील विमानात होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला.
advertisement
7/7
सौंदर्याने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खळबळ उडवली. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. एका वेळी तिनं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत रेखा आणि हेमा मालिनी यांना टक्कर दिली. अमिताभची नायिका बनून तिने प्रत्येक घरात स्वतःची ओळख निर्माण केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चनची हिरोईन, प्लेन क्रॅशमध्ये झाला मृत्यू; होती 7 महिन्यांची प्रेग्नंट