TRENDING:

Tamanna Weight Loss : अभिनेत्री तमन्ना भाटियाने 90 दिवसांत कमी केलं 5 ते 10 किलो वजन! ट्रेनरने सांगितले 3 सिक्रेट्स..

Last Updated:
Tamanna Bhatia Weight Loss Secret : अभिनेत्री तमन्ना भाटिया तिचे सौंदर्य आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या फिटनेससाठीही ओळखली जात आहे. तमन्नाने अवघ्या 90 दिवसांत 5 ते 10 किलो वजन कमी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमागे कोणतेही फॅड डाएट नाही, तर 3 सोप्या सवयी आहेत. तमानांच्या ट्रेनरने त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
1/9
तमन्ना भाटियाने 90 दिवसांत कमी केलं 5-10 किलो वजन! ट्रेनरने सांगितले 3 सिक्रेट्स
तमन्ना केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर हेल्थ आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. मात्र हेल्दी लाईफस्टाईल टिकवून ठेवणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. सुरुवातीला वजन कमी होते, पण सवयी न बदलल्याने ते पुन्हा वाढते.
advertisement
2/9
Economic Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तमन्नाच्या ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांचा भर शॉर्टकट्सऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या सवयींवर आहे. त्यांनी वजन कमी करण्यासाठी तीन प्रभावी पण सोपे नियम सांगितले आहेत.
advertisement
3/9
सिद्धार्थ सिंह यांच्या मते, योग्य पद्धत आणि सातत्य ठेवल्यास 90 दिवसांत 5 ते 10 किलो वजन कमी करणे शक्य आहे. यासाठी फार कडक नियमांची गरज नसून जीवनशैलीत छोटे बदल महत्त्वाचे आहेत.
advertisement
4/9
पहिली सवय म्हणजे हाय-प्रोटीन आहार घेणे. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि उगाचच खाणे टाळता येते. यामुळे वजन सांभाळण्यास मदत होते.
advertisement
5/9
प्रोटीनमुळे स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती होते, जे वर्कआउट करणाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे डाएट पाळणे सोपे होते आणि भूकही नियंत्रणात राहते.
advertisement
6/9
दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे भरपूर पाणी पिणे. अनेकदा भूक लागल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते. अशावेळी एक ग्लास पाणी पिणे फायदेशीर ठरते.
advertisement
7/9
योग्य हायड्रेशनमुळे क्रेव्हिंग्स कमी होतात आणि ओव्हरइटिंग टाळता येते. वजन कमी करण्याच्या प्रवासात ही सवय अनेकजण दुर्लक्षित करतात. म्हणूनच नेहमी योग्य प्रमाणावर पाणी पीत राहावे.
advertisement
8/9
तिसरी आणि शेवटची सवय म्हणजे नियमित व्यायाम. सिद्धार्थ सांगतात की, दिवसभर बसून राहिल्यास प्रगती थांबते. शरीर हलवणे, चालणे, वर्कआउट करणे खूप गरजेचे आहे.
advertisement
9/9
सिद्धार्थ यांचा साधा मंत्र आहे. 'बटाटा बनू नका.' योग्य आहार, पाणी आणि व्यायाम यामध्ये सातत्य राखल्यास कोणतेही कपडे तुम्हाला नीट बसू लागतात, शरीरात बदल दिसतो. तसेच वजन कमी होणे नैसर्गिक आणि शाश्वत प्रक्रिया बनते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tamanna Weight Loss : अभिनेत्री तमन्ना भाटियाने 90 दिवसांत कमी केलं 5 ते 10 किलो वजन! ट्रेनरने सांगितले 3 सिक्रेट्स..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल