TRENDING:

पहिल्या नवऱ्याकडून मारहाण, 9 वर्षाच्या मुलासाठी अभिनेत्रीचं बिजवराशी लग्न, तरी टिकला नाही एकही संसार

Last Updated:
'नच बलिए 4' जिंकलेल्या अभिनेत्रीने तिच्या एका सह-स्पर्धकाशी लग्न केले आणि लग्नाच्या काही वर्षांनी घटस्फोट घेतला. अभिनेत्रीने गेल्या वर्षी दुसरे लग्न केले पण ते वर्षभरही टिकले नाही आणि घटस्फोट घेतला. मुलासाठी अभिनेत्रीने घटस्फोटीताशी लग्न केलं.
advertisement
1/7
पहिल्या नवऱ्याकडून मारहाण, 9 वर्षाच्या मुलासाठी अभिनेत्रीचं घटस्फोटीताशी लग्न
'कुल वधू' अभिनेत्रीने 2015 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्याचा खुलासा केला होता. शो दरम्यान मी ज्या अभिनेत्याच्या प्रेमात पडले, ज्या अभिनेत्यासोबत मी नच बलिये सीझन 4 जिंकले, तोच मला लग्नानंतर मारायचा. लग्नाची 2-3वर्ष त्याला समजावायला लागली. लहान मुलगा माझ्या मांडीवर होता. भांडणाला कंटाळून घटस्फोट घेतला. वडिलांशिवाय आपल्या मुलाला पाहून अभिनेत्रीला वाईट वाटले, म्हणून तिने पुन्हा लग्न केले. पण तरीही नशीब बदलले नाही.
advertisement
2/7
अभिनेत्री दलजीत कौरने डिअर मी या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत पहिला नवरा शालिन भानोत आणि निखिल पटेल आणि दुसऱ्या घटस्फोटाबद्दल सांगितले.
advertisement
3/7
दलजीत कौरने 'कुल वधू' आणि 'नच बलिये'मध्ये शालीनसोबतचा प्रवास सुरू झाला होता. ती म्हणाली, "नच बलिये जिंकल्यानंतर काही महिन्यांतच आमचं लग्न झालं. लग्नाआधी मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखलं होते. मला माहीत असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या."
advertisement
4/7
दलजीत कौरने तिचे पहिले लग्न मोडल्यामुळे झालेल्या भावनिक हानीबद्दल सांगितले. ती म्हणाली, "2-3 वर्षांहून अधिक काळ, माझे लग्न संपले आहे हे मी नाकारत होते. 'घटस्फोट' हा शब्द माझ्यासाठी योग्य नाही; मी फक्त तुटले आणि रडले."
advertisement
5/7
दलजीत कौर म्हणाली, "जेडेन त्यावेळी माझ्या हातात होता. हे सोपे नव्हते. मी सगळ्या रोमँटिक प्रपोजलला नकार दिला कारण माझ्या मनात मी अजूनही विवाहित होते." घटस्फोटाच्या 9 वर्षांनंतरही, शालिन अधूनमधून त्याचा मुलगा जेडॉनला भेटायला येतो.
advertisement
6/7
दलजीत कौरने जेडॉनच्या हितासाठी पिता-पुत्राच्या भेटीगाठींना परवानगी दिली.  जेडॉनच्या वडिलांवरील प्रेमामुळे दलजीतला पुन्हा लग्न करण्याची प्रेरणा मिळाली.
advertisement
7/7
दलजीत कौर म्हणाल्या, "तो (जेडेन) पुन्हा लग्न करण्यास उत्सुक होता कारण तो त्याच्या वडिलांना मिस करत होता. त्याला त्याच्या वडिलांसाठी आसुसलेले पाहून हृदयद्रावक होते, विशेषत: फादर्स डे सारख्या प्रसंगी. असे वाटले की मी त्याला निराश केले आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या नवऱ्याकडून मारहाण, 9 वर्षाच्या मुलासाठी अभिनेत्रीचं बिजवराशी लग्न, तरी टिकला नाही एकही संसार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल