Dharmendra : उगाच नाही म्हणायचे ही-मॅन! वयाच्या 89 व्या वर्षीही फिट होते धर्मेंद्र, त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dharmendra Fitness : आजकाल जिथं लहान वयातच हार्ट अटॅक येत आहे, तिथं धर्मेंद्र यांनी नव्वदीच्या उंबरठ्यावरही स्वतःला फिट ठेवलं होतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते खूप मेहनत घ्यायचे.
advertisement
1/6

हार्ट अटॅक</a> येत आहे, तिथं धर्मेंद्र यांनी नव्वदीच्या उंबरठ्यावरही स्वतःला फिट ठेवलं होतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते खूप मेहनत घ्यायचे. त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय पाहुयात." width="1200" height="900" /> अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. पण आजच्या घडीला वयाचा हा आकडा गाठणंही सोपं नाही. आजकाल जिथं लहान वयातच हार्ट अटॅक येत आहे, तिथं धर्मेंद्र यांनी नव्वदीच्या उंबरठ्यावरही स्वतःला फिट ठेवलं होतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते खूप मेहनत घ्यायचे. त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय पाहुयात.
advertisement
2/6
अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह होते. ते त्यांचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असत. यात ते स्वतःच्या फिटनेसची माहिती देत आणि लोकांनाही फिटनेसबाबत जागरूक करत.
advertisement
3/6
त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर ते शारीरिकरित्या खूप अॅक्टिव्ह असल्याचं दिसेल. ते जिममध्ये व्यायाम करताना दिसले आहेत.
advertisement
4/6
त्यांना स्विमिंगची आवड होती. स्विमिंग पूलमध्ये पोहोतानाचे तर त्यांचे किती तरी व्हिडीओ सापडतील. त्यामुळे त्यांच्या पायांचा व्यायाम होत होता. पोहण्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, हृदय निरोगी राहते आणि मूड सुधारतो. ते त्यांच्या फार्महाऊसवर ट्रॅक्टरही चालवायचे.
advertisement
5/6
धर्मेंद्र फिजिओथेरपी घेत असत एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी निरोगी राहण्यासाठी विविध व्यायाम शिकवल्याबद्दल त्यांच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसंच एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी आपण कशा पद्धतीने फिजिओथेरेपी आणि व्यायाम करतो हे सांगत, चाहत्यांनाही व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहीत केलं. आपल्या चाहत्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे, आरोग्य हेच सर्वस्व आहे, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
6/6
त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये असंही लिहिलं होतं की, "मित्रांनो, मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी जन्मलो आहे. तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, निरोगी आणि मजबूत राहा. स्नायूंना स्मृती असते, ते तुमच्याकडे परत येतात. नियमित व्यायाम करा"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dharmendra : उगाच नाही म्हणायचे ही-मॅन! वयाच्या 89 व्या वर्षीही फिट होते धर्मेंद्र, त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय?