TRENDING:

Diwali Detox : दिवाळीत गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन आता कसं तरी होतंय? मग असं करा शरीराला डिटॉक्स

Last Updated:
काही दिवस हेच गोड आणि तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर जड वाटायला लागतं आणि काहीतरी हलकं, तिखट किंवा फ्रेश खावंसं वाटतं. फराळाचाही कंटाळा येतो. अशा वेळी शरीराला खरंतर थोडंसं “डिटॉक्स” करण्याची गरज असते.
advertisement
1/7
दिवाळीत गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन आता कसं तरी होतंय? मग असं करा शरीराला डिटॉक्स
दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध पसरतो. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे हे सगळं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. पण काही दिवस हेच गोड आणि तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर जड वाटायला लागतं आणि काहीतरी हलकं, तिखट किंवा फ्रेश खावंसं वाटतं. फराळाचाही कंटाळा येतो. अशा वेळी शरीराला खरंतर थोडंसं “डिटॉक्स” करण्याची गरज असते.
advertisement
2/7
दिवाळीत बनवला जाणारा फराळ हा आपल्या सणाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल बरेच लोक फराळ बाहेरून विकत घेतात, पण घरी केलेला फराळ चविष्ट लागतोच. मात्र या फराळात मैदा, बेसन, रवा, साखर, तूप, डालडा आणि तेल यांचा भरपूर वापर होतो. त्यामुळे तो जरी स्वादिष्ट असला तरी तो पोट मात्र गच्च करतो.
advertisement
3/7
अनेकदा दिवसभर नाश्त्यापासून ते संध्याकाळपर्यंत फराळाचं सेवन होत राहतं. काही दिवसांनी मात्र पोट फुगणे, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अंग दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. जास्त साखर आणि तेलकट पदार्थांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा पचनाचे त्रास वाढू शकतात.
advertisement
4/7
अशा वेळी शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि आतून स्वच्छ करण्यासाठी “डिटॉक्स वॉटर” खूप उपयोगी ठरतं. हे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकतं आणि त्वचेपासून ते पचनसंस्थेपर्यंत सर्वत्र ताजेतवानेपणा आणतं. आता आम्ही तुम्हाला काही असे पर्याय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचं शरीर हलकं आणि फ्रेश करु शकता.
advertisement
5/7
लिंबू आणि काकडीचे लहान तुकडे करून एका भांड्यात टाका. त्यात काही बर्फाचे तुकडे आणि साधं पाणी घाला. हे मिश्रण नीट ढवळा आणि 2-3 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर हे थंड पाणी दिवसभरात थोडं-थोडं करून प्या. हवं असल्यास रात्रीभर ते तसेच ठेवून सकाळी प्यायलात तरी ते चवीला अधिक छान लागते.
advertisement
6/7
दररोज एक कप डिटॉक्स वॉटर प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, पचन सुधारतं आणि दिवाळीच्या फराळानंतर शरीर हलकं, ताजं वाटायला लागतं.
advertisement
7/7
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Detox : दिवाळीत गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन आता कसं तरी होतंय? मग असं करा शरीराला डिटॉक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल