TRENDING:

AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार! एका दिवसात डायबेटिज गायब? 30 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा

Last Updated:
Aiims Diabetes Cured With Surgery : नवी दिल्लीतील एम्स येथील डॉक्टरांनी मधुमेहावर कायमचा इलाज शोधून काढला आहे. याद्वारे अनियंत्रित मधुमेहाने ग्रस्त असलेले 30 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनीच या उपचाराबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
advertisement
1/7
AIIMSच्या डॉक्टरचा चमत्कार! एका दिवसात डायबेटिज गायब? 30 रुग्ण बरे झाल्याचा दावा
डायबेटिज एकदा झाला की आयुष्यभर राहतो, असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत. डायबेटिचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, तो फक्त औषधोपचार, व्यायाम किंवा जीवनशैलीतील बदलांनी नियंत्रित केला जाऊ शकतो. पण एम्स नवी दिल्लीतील डॉक्टरांनी मात्र हे चुकीचं ठरवलं आहे. त्यांनी डायबेटिज रुग्णांचा डायबेटिज गायब करून दाखवला आहे. तोही फक्त 2 तासांच्या सर्जरीने. 30 रुग्ण बरे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या एका वर्षात एम्स नवी दिल्लीच्या शस्त्रक्रिया विभागाने अनियंत्रित टाइप-2 मधुमेहाने ग्रस्त 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांची डायबेटिजमधून सुटका केली आहे.
advertisement
2/7
नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील शस्त्रक्रिया विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. मंजुनाथ म्हणतात की, बरेच लोक मधुमेहावरील उपचार म्हणजे केवळ औषधोपचाराद्वारे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणं असं समजतात, पण प्रत्यक्षात हा उपचार नाही.  भारतात दररोज 3 गोळ्या घेतल्यानंतरही अनेक रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहते आणि अवयव निकामी होण्याचं प्रमाण वाढत आहे. आता औषधं, जीवनशैलीतील बदल किंवा आहारातील बदलांनंतरही कायम राहणारा मधुमेह शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लठ्ठपणा कमी करते आणि मधुमेह दूर करते, कारण लठ्ठपणा आणि मधुमेह एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
advertisement
3/7
डॉ. मंजुनाथ यांना सांगितलं की, गेल्या दीड वर्षात 120 रुग्णांवर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यापैकी 30% रुग्णांमध्ये साखरेची पातळी अनियंत्रित होती. या रुग्णांपैकी एक खासदार ज्यांचा बीएमआय 27 आणि एचबीए1सी 11.7 होता. त्यांचा उपवासातील साखरेचा स्तर 300 पेक्षा जास्त होता आणि त्यांची जेवणानंतरची साखरेची पातळी 390 होती. सुमारे 10 वर्षे टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त राहिल्यानंतर खासदारांनी त्यांच्या पोटावर आणि आतड्यांवर शस्त्रक्रिया केली. आता गेल्या पाच महिन्यांपासून त्यांची साखरेची पातळी पूर्णपणे सामान्य झाली आहे. डायबेटिज गेला आहे.
advertisement
4/7
आता ही सर्जरी कोणती? तर मेटाबॉलिक सर्जरी. 2 तासांची ही शस्त्रक्रिया आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की ही शस्त्रक्रिया स्वादुपिंडावर नाही तर पोट आणि आतड्यांवर केली जाते. पोट आणि आतड्यांचं स्ट्रक्चर बदललं जातं. पोटाचा भाग कापला जातो आणि तो लहान आतड्यांशी जोडला जातो. ज्यामुळे अन्न अन्नवाहिनेतून पोटात न जाता थेट आतड्यात जातं. ते GLP-1 सारखे हार्मोन्स सोडतं, जे इन्सुलिन वाढवतं, रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड्स, लिपिड प्रोफाइल, प्रोटीन युरिया आणि एकूण चयापचय आरोग्य सामान्य करतं. एकंदर सर्जरीनंतर मेटाबॉलिझ्म प्रक्रियेत बदल होतो. अन्न लवकर पचतं आणि शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी वाढते. ज्यामुळे एका दिवसात ब्लड शुगर नैसर्गिकरित्या कमी होतं आणि शुगरच्या गोळ्या बंद कराव्या लागतात.
advertisement
5/7
पण ही शस्त्रक्रिया सगळ्या रुग्णांसाठी नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. ही शस्त्रक्रिया अशा रुग्णांसाठी आहे ज्यांची शुगर आहार, जीवनशैलीतील बदल आणि औषधांनंतरही कंट्रोलमध्ये राहत नाही.  ज्या मधुमेहींचे HbA1c 6 किंवा 6.5 आहे त्यांना या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. ते औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे त्यांच्या रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करू शकतात. शिवाय, जर एखाद्या रुग्णाला 25 वर्षांपासून मधुमेह असेल आणि तो 100 युनिट्स इन्सुलिन घेत असेल, तर त्यांच्या पेशी आधीच संपलेल्या असतात आणि फक्त 10 किंवा 5 टक्के शिल्लक असतात, अशा रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया प्रभावी नाही.
advertisement
6/7
2016 मध्ये जागतिक मार्गदर्शक तत्वांमध्ये ही शस्त्रक्रिया केवळ लठ्ठपणासाठीच नाही तर टाइप 2 मधुमेहासाठी देखील आहे हे मान्य केलं गेलं होतं. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने अधिकृतपणे मान्यता दिली आहे की मेटाबॉलिक शस्त्रक्रिया अनियंत्रित मधुमेहावर उपचार करू शकते. पण लठ्ठपणा नसलेल्या काही लोकांना देखील मधुमेह उपचारांसाठी या शस्त्रक्रियेचा फायदा झाला आहे.
advertisement
7/7
आता या शस्त्रक्रियेचा खर्च किती आहे तर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एम्समध्ये याचे काही चार्जेस नाहीत. पण इतर हॉस्पिटल्समध्ये 4 ते 6 लाख रुपये घेतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार! एका दिवसात डायबेटिज गायब? 30 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल