TRENDING:

Ashadhi Ekadashi Wishes Quotes : कानडा राजा पंढरीचा... आषाढी एकादशीनिमित्त Whatspp Status Photo

Last Updated:
Ashadhi Ekadashi Wishes Quotes : पंढरपूरचा पांडूरंग म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर विठुरायाचे छान छान स्टेटस ठेवू शकता. तुमच्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत विठूमाऊलीचे सुंदर स्टेटस.
advertisement
1/7
कानडा राजा पंढरीचा... आषाढी एकादशीनिमित्त Whatspp Status Photo
आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळ नाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेमपान्हा पाजणारे मनोहर रूप.
advertisement
2/7
भारतीय कालदर्शिकेनुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आषाढी एकादशी वर्षभरातील एक महत्त्वाची एकादशी असते. 
advertisement
3/7
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी ज्याला देवशयनी एकादशीही म्हणतात.  ‘शयन’ म्हणजे झोप. या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात.
advertisement
4/7
या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला ‘परिवर्तनी एकादशी’ असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हणतात. 
advertisement
5/7
या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो.  हिंदू धर्मकल्पनांनुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चतुर्मास म्हणतात. 
advertisement
6/7
आषाढी एकादशी हा दिवस वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल होतात.
advertisement
7/7
धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वत:चे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात, चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ashadhi Ekadashi Wishes Quotes : कानडा राजा पंढरीचा... आषाढी एकादशीनिमित्त Whatspp Status Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल