TRENDING:

Papaya : पपई सोबत चुकूनही खाऊ नका 5 पदार्थ, शरीराला फायदे मिळण्याऐवजी होईल नुकसान

Last Updated:
पपईचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु काही पदार्थांसोबत पपईचे एकत्रितपणे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. असे केल्याने आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा आयुर्वेदाचार्य डॉ. सर्वेश कुमार हे पपईचे सेवन करण्याविषयी काय सांगतात याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
1/5
पपई सोबत चुकूनही खाऊ नका 5 पदार्थ, शरीराला फायदे मिळण्याऐवजी होईल नुकसान
पपई आणि दूध : पपई आणि दूध याचे सेवन एकत्र कधीच करू नये. जर तुम्ही पपई सोबत दुधाचे सेवन एकत्र केले तर तुम्हाला डायरिया, बद्धकोष्टता सारख्या समस्या होऊ शकतात. तेव्हा या दोघांचे सेवन करताना जवळपास 30 मिनिटांचे अंतर ठेवा.
advertisement
2/5
पपई आणि कारलं : पपई सोबत कारल्याचे सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहोचू शकते. कारण पपईमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने ती शरीराला हायड्रेट ठेवते, तर कारलं हे शरीरातील पाणी सोखण्याच काम करत. तसेच या दोघांची चव देखील वेगवेगळी आहे. पपई आणि कारल्याचे सेवन मोठ्यांपेक्षा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
advertisement
3/5
पपई आणि लिंबू : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लिंबू आणि पपईचे एकत्र सेवन शरीरासाठी हानिकारक आहे. अनेकदा लोक पपईच्या फ्रुटचाटवर लिंबूचा रस पिळून त्याचे सेवन करतात. परंतु या कॉम्बिनेशनमुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि रक्ताशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा पपई खाताना त्यावर लिंबू पिळून खाणे टाळावे.
advertisement
4/5
पपई आणि दही हे दोन पदार्थ एकत्र न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉ. सर्वेश कुमार यांच्या सांगण्यानुसार पपई ही गरम असते आणि दही ही थंड असते. त्यामुळे या दोघांचे एकत्र सेवन करणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. याचे एकत्र सेवन केल्याने सर्दी, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या दोन्ही पदार्थांचे सेवन करायचे असेल तर यात एक तासाचे अंतर असायला हवे.
advertisement
5/5
पपई सोबत संत्र : पपई सोबत संत्र्याचं सेवन केल्याने देखील शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पपई ही चवीला गोड असते तर संत्र हे चवीला काहीस आंबट असत. त्यामुळे जर या दोन्ही फळांचे सेवन एकत्र केले तर शरीरात टॉक्सिन्स निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, डायरिया आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Papaya : पपई सोबत चुकूनही खाऊ नका 5 पदार्थ, शरीराला फायदे मिळण्याऐवजी होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल