Diwali Tips : दिवाळीपूर्वी देवाच्या भांड्यांसोबतच मूर्तीही चमकतील! 'या' पद्धतीने करा स्वच्छता..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Diwali Idols Cleaning Tips : सणासुदीचा काळ आहे आणि सगळे साफसफाईच्या कामात व्यस्त आहेत. लोक घराची स्वच्छता करता, पण कधीकधी लहान गोष्टींकडे लक्ष जात नाही. जसे की, तुमच्या घरातील मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्ती. तुम्ही कोणतीही मेहनत न करता त्यांना मिनिटांत चकचकीत करू शकता.
advertisement
1/7

अनेकदा असे दिसून येते की, सणांच्या वेळी लोक आपली घरे तर चमकवतात, पण मंदिरात ठेवलेल्या मूर्ती साफ करायला विसरतात. पितळेच्या मूर्ती आणि पितळेच्या कोणत्याही वस्तू खूप काळ ठेवल्यानंतर त्यांचा रंग फिका पडतो आणि त्यावर घाण जमा होते.
advertisement
2/7
आज आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरात ठेवलेल्या पितळेच्या मूर्ती सहज साफ करू शकता. फक्त 5 मिनिटांत तुमच्या मूर्ती साफ होतील आणि सोन्यासारख्या चमकू लागतील.
advertisement
3/7
लोकल18 च्या टीमने तज्ज्ञ अजय पवार यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आतापर्यंत तुम्ही घरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तींची साफसफाई करण्यासाठी पितांबरीचा वापर करत असाल.
advertisement
4/7
पण आज आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमच्या घरी ठेवलेल्या देवाच्या पितळेच्या मूर्ती सोन्यासारख्या चमकू लागतील.
advertisement
5/7
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दही आणि आमचूर पावडर घ्यायची आहे. एका वाटीत 50 ग्रॅम दही आणि चिमूटभर आमचूर पावडर मिसळा. आधी देवाच्या मूर्तीला गरम पाण्याने साफ करून घ्या.
advertisement
6/7
त्याचे मिश्रण तयार करून घ्या आणि एका प्लेटमध्ये देवाच्या मूर्ती ठेवून त्यावर हे मिश्रण टाका. ते घासून 10 मिनिटांसाठी तसेच सोडून द्या, ज्यामुळे मूर्तीवर साचलेली धूळ-माती आणि काळसरपणा त्वरित निघून जाईल.
advertisement
7/7
एवढे केल्याने असे वाटेल की, तुम्ही आजच मूर्ती खरेदी केली आहे. मूर्ती सोन्यासारख्या चमकू लागतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपयांची गरज असेल, ज्यामुळे तुमची मूर्ती चमकून निघेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Tips : दिवाळीपूर्वी देवाच्या भांड्यांसोबतच मूर्तीही चमकतील! 'या' पद्धतीने करा स्वच्छता..