ख्रिसमसची खरेदी झाली का? पुण्यात या मार्केटमध्ये मिळतायेत स्वस्तात वस्तू
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
नाताळासाठी पुण्यातल्या बाजारपेठा देखील सजलेल्या पाहायला मिळत आहेत.
advertisement
1/7

ख्रिसमस सण जवळ आला आहे. त्यामुळे सगळीकडेच बाजारपेठांमध्ये सध्या नाताळच्या शॉपिंगसाठी गर्दी दिसतं आहे. ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज, सजावटीचं सामान आणि गोडधोड पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आहे.
advertisement
2/7
नाताळासाठी <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातल्या</a> बाजारपेठा देखील सजलेल्या पाहायला मिळत आहेत. सर्वांचाच लाडका नाताळबाबा म्हणजेच सांताक्लॉज देखील मुलायम अशा लाल टोपी आणि लाल कपड्यांमध्ये दिमागदार उभा असलेला पाहायला मिळतोय.
advertisement
3/7
सध्या पुण्यातील शुक्रवार पेठ बाजारपेठेत ख्रिसमस सणासाठी महत्त्वाचे असणारे झाड म्हणजेच ख्रिसमस ट्री, यावर सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे संता म्युझिकल उपलब्ध आहेत.
advertisement
4/7
तसेच आर्टिफिशियल पद्धतीने बनवलेल्या सर्व प्रकारच्या सजावटीच्या सामानामध्ये यंदा वाढ झालेली पाहायला मिळते.
advertisement
5/7
विद्युत रोषणाईसाठी छोटे छोटे दिवे, झाडावर लटकवण्यासाठी चेंडू, चांदण्या अशा अनेक सजावटींचे सामान पाहायला मिळते .
advertisement
6/7
ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, मॅजिक बॉल, गोल्डन सिल्व्हर स्टार सांता कॅप, मास्क, तरुणांसाठी सांता ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस, जिंगल जिंगल बेल्स म्हणणारा सांताही दुकानांमध्ये दिसत आहे.
advertisement
7/7
40 रुपयांपासून ते दीड हजारापर्यंत या ठिकाणी ख्रिसमसाठी उत्तम उत्तम प्रकारच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करता येतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ख्रिसमसची खरेदी झाली का? पुण्यात या मार्केटमध्ये मिळतायेत स्वस्तात वस्तू