TRENDING:

Relation In Pregnancy : प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणाले हो, पण फक्त याचदिवशी

Last Updated:
Physical Relation In Pregnancy Is Safe Or Not : सामान्यपणे अनेकांना वाटतं की प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू नये, यामुळे बाळाच्या डोक्याला इजा होईल किंवा त्याला आणखी काहीतरी दुखापत होईल, गर्भपात होईल अशी भीती असते.
advertisement
1/7
प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणाले हो, पण फक्त याचदिवशी
आईवडील होणं हे प्रत्येक कपलचं स्वप्न असतं. प्रेग्नंट झालं की त्यापेक्षा दुसरा आनंद नसतो. पण प्रेग्नन्सीचा कालावधी 9 महिन्यांचा. या कालावधी जर नवरा-बायकोला शारीरिक संबंध ठेवायची इच्छा झाली तर...
advertisement
2/7
प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? प्रेग्नन्सी शारीरिक संबंध ठेवल्याने बाळाला इजा तर होणार नाही ना? गर्भपात तर होणार नाही? अशी भीती, कितीतरी प्रश्न लोकांच्या मनात येतात. याचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे.
advertisement
3/7
हा विषय असा आहे की थेट आपण डॉक्टरांनाही विचारू शकत नाही. पण एका डॉक्टरने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. डॉ. प्रियांका ज्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ आहेत, त्यांनी प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकता असं सांगितलं आहे. पण त्याचा एक विशिष्ट कालावधी असल्याचं त्या म्हणाल्या.
advertisement
4/7
डॉ. प्रियांका यांनी सांगितलं, प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांत शारीरिक संबंध ठेवणं टाळा. कारण यावेळी इन्फेक्शन, ब्लीडिंग आणि गर्भपाताचा धोका जास्त असतो. पण नंतरचे 3 महिने म्हणजे चौथा, पाचवा, सहावा महिना तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता, हा कालावधी खरंतर प्रेग्नन्सीतील हनीमूनचा कालावधी मानला जातो
advertisement
5/7
पुढे त्या म्हणाल्या, तुमच्या प्रेग्नन्सीत काही समस्या नसेल तर या काळातील शारीरिक संबंध सुरक्षित मानले जातात. त्यानंतर शेवटचे तीन महिने विशेषत: नवव्या महिन्यात तर काही वेळा किंवा काही डॉक्टर स्वतःच कपल्सना रिलेशन ठेवण्याचा सल्ला देतात. याचं कारण म्हणजे वीर्यात असलेले लिक्टेक्ट एंझाइम बहुतेक वेळा नैसर्गिक प्रसूतीमध्ये मदत करतात"
advertisement
6/7
"एकंदरच काय तर प्रेग्नन्सीत कोणती समस्या नसेल तर प्रेग्न्सीत शारीरिक संबंध ठेवणं सुरक्षित आहे. पण प्लेसेंटा खालच्या बाजूला असेल, आधी गर्भपात झाला असेल, प्रेग्न्सीत ब्लीडिंग होत असेल तर शारीरिक संबंध बिलकुल ठेवू नका", असा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
7/7
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. हा आरोग्यविषयक सल्ला नाही. याची अंमलबजावणी करताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Relation In Pregnancy : प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणाले हो, पण फक्त याचदिवशी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल