Curd Rice : गरम भात दह्यासोबत का खाऊ नये, असा दही-भात खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Curd Rice Effects On Health : दही आणि भात कित्येक जण खातात. काही दुसरं खायचं मन नसेल, हलकं काहीतरी खायचं आहे, अशावेळी दही-भात बेस्ट. पोट बिघडलं की बहुतेक लोक दही भातच खातात. पण खरंतर गरम भात आणि दही एकत्र खाऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
1/7

भारतीय जेवणात दही-भात हा अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. अनेकांना वाटतं की दही आणि भात एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने गरम भात आणि थंड दही एकत्र खाणं हे विरुद्ध आहार मानलं जातं.
advertisement
2/7
आयुर्वेदानुसार दही हे थंड, जड, कफ वाढवणारे, आंबट चवीचे आहे. ते पचण्यासाठही वेळ लागतो. तर गरम भात हा उष्ण हलका पण गरम असताना पचनावर प्रभाव टाकणारा आहे.
advertisement
3/7
गरम भात आणि थंड दही हे दोन विरुद्ध तापमानाचे पदार्थ आहेत. हे एकत्र खाल्ल्यावर शरीराचा पचनाग्नी बिघडतो. गरम भात पचनाग्नी वाढवतो, तर दही ते कमी करतं. या विरोधामुळे पचनप्रक्रिया मंद होते.
advertisement
4/7
परिणामी अन्न नीट पचत नाही. गॅस, पोट फुगणं यासारखे त्रास होतात. अपूर्ण पचनामुळे शरीरात आम म्हणजे विषारी घटक साठू लागतात. यामुळे सांधेदुखी, त्वचारोग, सततचा थकवा, अशा समस्या उद्भवतात.
advertisement
5/7
आधुनिक पोषणशास्त्रानुसार दही हे प्रोबायोटिक आहे, पण ते खूप गरम अन्नासोबत खाल्ल्यास त्यातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. शिवाय गरम-थंड अन्न एकत्र घेतल्याने पचनसंस्थेवर ताण पडतो.
advertisement
6/7
दही आणि गरम भात हे कॉम्बिनेशन परिस्थिती आणि पद्धतीवर अवलंबून असतो. योग्य वेळ, योग्य तापमान आणि योग्य प्रमाण पाळलं तर त्रास होत नाही. पण रोज सवयीने गरम भातात थंड दही घालून खाणं हे दीर्घकाळासाठी शरीराला अपायकारक ठरू शकतं.
advertisement
7/7
मग दही-भात पूर्णपणे टाळायचा का? तर नाही. भात थोडा कोमट झाल्यावर दही मिसळावं. दही खूप थंड नसावं. त्यात थोडं तूप किंवा जिरं पूड घालावी दही-भात दुपारच्या जेवणात खावा, रात्री टाळावा. ज्यांना सतत गॅस, अॅसिडिटी होते, सर्दी-कफचा त्रास आहे, पचन कमजोर आहे, त्वचारोग किंवा सांधेदुखी आहे, त्यांनी दहीभात टाशळावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Curd Rice : गरम भात दह्यासोबत का खाऊ नये, असा दही-भात खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?