जेवणानंतर बडीशेप खाता, नेमके फायदे माहिती आहेत का? फक्त पचन नाही, तर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जेवण झाल्यानंतर अनेकजण बडीशेप खातात. बडीशेपमुळे अन्नपचन व्यवस्थित होतंच, तसंच याव्यतिरिक्तही अनेक फायदे मिळतात. ते नेमके कोणते आहेत जाणून घेऊया. (काजल मनोहर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

बडीशेप माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ली जाते. यात असलेल्या नैसर्गिक सुगंधामुळे तोंडातून दुर्गंधी दूर होते. तसंच बडीशेपचं पाणी प्यायल्यास चरबी कमी होते आणि मेटाबॉलिज्म वाढतं. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. तसंच चमचाभर बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी हे पाणी प्यायल्यास पचनक्रिया उत्तम होते.
advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर पिंटू भारती सांगतात की, बडीशेपमध्ये अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म असतात. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटदुखीवर आराम मिळतो. जेवण झाल्यानंतर बडीशेप चावून खाल्ल्यास अन्नपचनही व्यवस्थित होतं.
advertisement
3/5
बडीशेपमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसंच दात आणि हिरड्या सुदृढ राहतात. यात अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे तोंडातील जंतू कमी होण्यास मदत मिळते. तसंच बडीशेपमुळे मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या अंगदुखीवरही आराम मिळू शकतो. हॉर्मोनल संतुलन राखण्यात बडीशेप उपयुक्त असते.
advertisement
4/5
बडीशेपचं पाणी किंवा चहा मेटाबॉलिज्म वाढविण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळतेच, तसंच शरीर स्वच्छ होतं आणि भूक नियंत्रित राहते. बडीशेपमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, ए आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. म्हणजेच शरीर विविध आजारांशी लढण्यासाठी तयार होतं. बडीशेप डोळ्यांसाठीदेखील उत्तम मानली जाते.
advertisement
5/5
बडीशेपमुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो, आरोग्य उत्तम राहतं, रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. तसंच बडीशेपमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. त्यामुळे ती हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बडीशेपमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
जेवणानंतर बडीशेप खाता, नेमके फायदे माहिती आहेत का? फक्त पचन नाही, तर...