अंड्याचं बलक खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? नेमका कुणी खाऊ नये अंड्यातला पिवळा भाग?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अंडी आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतात. अंड्यातील पिवळ्या भागाला म्हणतात बलक, ज्यात प्रथिनं, विविध जीवनसत्त्व आणि अनेक खनिजं असतात. ज्यामुळे हाडं भक्कम होतात, त्वचेचा पोत सुधारतो, परंतु काही लोकांनी अंड्यातील बलक अजिबात खाऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
1/5

अंड्याच्या बलकात डी, बी12 अशा जीवनसत्त्वांसह ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि अनेक खनिजं असतात. तसंच यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि कोलीनमुळे मेंदूचं कार्य सुधारतं. बलकाचं सेवन केल्यास शरीरातील जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु...
advertisement
2/5
अंड्याच्या बलकात 186 मिलीग्राम एवढं भरपूर कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकाराच्या समस्यांनी त्रस्त लोकांनी अजिबात बलक खाऊ नये. कारण यामुळे रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढू शकते.
advertisement
3/5
संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी बलकाचं जास्त सेवन करणं हानीकारक ठरू शकतं. यामुळे हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
advertisement
4/5
वजन कमी करायचं असल्यास बलक खाणं टाळावं. त्यात असलेल्या कॅलरीज आणि फॅट्समुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. तर याउलट अंड्यांचा पांढरा भाग प्रथिनांनी परिपूर्ण असतो, त्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तो खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
5/5
जास्त बलक खाल्ल्यानं यकृतासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. फॅटी लिव्हर किंवा हेपेटायटीस अशी यकृतासंबंधित काही समस्या असेल तर बलक खाणं टाळावं. त्यात असलेल्या फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलमुळे यकृतावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. ज्यामुळे यकृताची स्थिती आणखी बिघडू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अंड्याचं बलक खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? नेमका कुणी खाऊ नये अंड्यातला पिवळा भाग?