TRENDING:

फक्त 20 रुपयात मिळते प्लेट; 86 वर्षांपासून प्रसिद्ध बुढीचा चिवडा कधी खाल्लाय का?

Last Updated:
86 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
1/6
फक्त 20 रुपयात मिळते प्लेट; 86 वर्षांपासून प्रसिद्ध बुढीचा चिवडा कधी खाल्लाय का?
चिवडा म्हंटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि विदर्भात चिवड्याचे खवव्ये कमी नाहीत. त्यातही यवतमाळ शहरातील आझाद मैदान संकुलात पारंपरिक चिवडा आजही तितकाच स्पेशल आहे.
advertisement
2/6
या चिवड्याला 10 किंवा 20 वर्ष नाही तर तब्बल इंग्रज काळापासून 86 वर्ष झालेत. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सुरू झालेला हा चिवड्याचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे. स्वर्गीय अंजनाबाई भुजाडे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे पणतू अजय भुजाडे सध्या चालवत असून यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
3/6
अंजनाबाई यांचे पती एका कपड्याच्या दुकानात कामाला होते. 1936 साली अंजनाबाई भुजाडे यांनी संसार चालवताना पतीला हातभार मिळावा म्हणून याच जागी चिवड्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांचे पणतू अजय भुजाडे हे व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र तेव्हापासून त्याच जागी तीच चिवड्याची चव यवतमाळकर आवर्जून चाखून जाताहेत.
advertisement
4/6
ज्याकाळात महिला व्यवसायासाठी पुढे येत नव्हत्या त्या काळात स्व. अंजनाबाईंनी चिवड्याचा यशस्वी व्यवसाय केला. त्यावेळी अवघे 1 आणे किंमत होती. आणि आता 20 रुपये प्लेट या बुढिच्या चिवड्याची किंमत आहे.
advertisement
5/6
अनेक नागरिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन विशेषतः हा बुढीचा चिवडा खाणे पसंत करतात. चिवड्याची वाढती प्रसिद्धी बघून अजय भुजाडे यांनी आपल्या आजीच्या पारंपारिक व्यवसायाला आणखी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
6/6
भाजलेले पोहे, मटकी, कांदा, विशेष मसाले आणि लिंबू यांचे मिश्रण घालून स्वादिष्ट चमचमीत चिवडा तयार केला जातो. या चिवड्याची चव यवतमाळकर विदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडेही पाठवत असतात. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही नोकरीचा मार्ग सोडून आजीचा व्यवसाय पुढे नेण्याचा भुजाडे यांचा प्रयत्न प्रेरणादायी ठरतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
फक्त 20 रुपयात मिळते प्लेट; 86 वर्षांपासून प्रसिद्ध बुढीचा चिवडा कधी खाल्लाय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल