चिकन, मटण खाण्याची योग्य वेळ कोणती? दुपारी खाणं बेस्ट की रात्री?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
बुधवार असला, शुक्रवार असला की अनेकजणांना मांसाहाराशिवाय काही जेवण जातच नाही, रविवार तर मांसाहाराशिवाय रविवार असल्यासारखाच वाटत नाही. काहीजणांना नाश्त्यात, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात असं कधीही नॉनव्हेज दिलं तरी ते हवंहवंसं वाटतं. परंतु तुम्हाला माहितीये का, मांसाहारी पदार्थ खाण्याचीही एक योग्य वेळ आहे. आहारतज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/5

चिकन किंवा मटणाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला चटकन् पाणी सुटतं. नॉनव्हेज खाण्याची नेमकी योग्य वेळ तरी कुठली, जाणून घेऊया.
advertisement
2/5
आहारतज्ज्ञ सांगतात की, मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात. ते पचण्यासाठी जर पुरेशी वेळ दिली नाही, तर पोट बिघडू शकतं.
advertisement
3/5
अनेकजण रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थ खातात. परंतु रात्री शरीराची फार हालचाल होत नाही. कारण ही झोपण्याची वेळ असते. त्यामुळे...
advertisement
4/5
दुपारच्या जेवणात मांसाहारी पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावं, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. तसंच चिकन, मटण, मासे किंवा अंडी फ्रेश असायला हवे.
advertisement
5/5
मांसाहारातून शरीराला अनेक पोषक तत्त्व मिळतात. परंतु जर ते ताजं नसेल किंवा अवेळी खाल्लं तर अन्नपचनाचा त्रास होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चिकन, मटण खाण्याची योग्य वेळ कोणती? दुपारी खाणं बेस्ट की रात्री?