कोन दाबेली ते कुल्हड पिझ्झा! मुंबईच्या खाऊ गल्लीत मिळतात एक से एक पदार्थ
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुंबईत घाटकोपरची खाऊ गल्लीही वेगवगेळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या खाऊ गल्लीमधीलच काही पदार्थांची माहिती तुम्हाला देणार आहोत.
advertisement
1/6

विविध खाद्यपदार्थांची मुंबईत कमतरता नाही. वेगवगेळ्या प्रकारचा खाद्यपदार्थांचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता योतो. <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईत</a> घाटकोपरची खाऊ गल्लीही वेगवगेळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या खाऊ गल्लीमधीलच काही पदार्थांची माहिती तुम्हाला देणार आहोत.
advertisement
2/6
कोन दाबेली: तुम्ही अनेक वेळा आइस क्रिमचा कोण खाल्ला असेल. अनेकदा पावासोबत बटर दाबेली खाल्ली असेल. पण घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील दिलखुश फूड स्टॉल वर चक्क कोन दाबेली खायला मिळते. आइस्क्रीम प्रमाणे दाबेली कोणमध्ये सर्व केली जाते. या कोन दाबेलीची किंमत 40 रुपये एवढी आहे.
advertisement
3/6
भाकरी पिझ्झा: या खाऊ गल्लीत मिळणारा हा पिझ्झा खवय्यांना आकर्षित करत आहे. रामानंदी स्टॉल वर मिळणारा हा भाकरी पिझ्झा खाण्यासाठी हेल्थी असा आहे. कारण यात मैद्याचा ब्रेड न वापरता विविध प्रकारच्या धान्याची भाकरी वापरली जाते. या भाकरी पिझ्झाची किंमत 150 रुपये एवढी आहे.
advertisement
4/6
आइस ढोकळा: घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील वर्षा चाट सेंटर या ठिकाणी आइस ढोकळा अगदी दही पुरी सारखाच मिळतोय. या आइस ढोकळ्याची किंमत 60 रुपये एवढी आहे.
advertisement
5/6
मसाला खारी: तुम्ही अगदी रोजच चहा सोबत खारी तर नक्कीच खात असाल. पण चहा सोबत खाल्ल्या जाणाऱ्या खारीला एक नवीन चटपटीत पदार्थ असा आकार घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील लालजी पावभाजी या दुकानाने दिला आहे. या ठिकाणी चक्क मसाला खारी मिळत आहे. या मसाला खारीची किंमत 100 रुपये एवढी आहे.
advertisement
6/6
कुल्हड पिझ्झा : तुम्ही आजवर मातीच्या कपात चहा तर नक्कीच पिला असेल. पण कुणी त्याच मातीच्या कपात पिझ्झा विकत असेल तर? घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील केतकी कुल्हड पिझ्झा विकत आहेत. या ठिकाणी तुम्ही चहाच्या कपात पिझ्झा खाऊ शकता. या कुल्हड पिझ्झाची किंमत 100 रुपये प्रती कुल्हड एवढी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कोन दाबेली ते कुल्हड पिझ्झा! मुंबईच्या खाऊ गल्लीत मिळतात एक से एक पदार्थ