झोपण्याआधी थोडं खोबरं खा; सकाळी फ्रेश वाटेल, पोट झटक्यात होईल हलकं!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Coconut Benefits: काहीजणांचा स्वयंपाक ओल्या नारळाशिवाय होतच नाही. तर, काहीजण जेवणात सुकं खोबरं वापरतात. पूजेतही नारळाचा वापर होतो. शिवाय नारळपाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात, शहाळं खाल्ल्यानं जीव अगदी तृप्त होतो. तुम्हाला माहितीये का, नारळ योग्य वेळी खाल्ल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. (रवी पायक, प्रतिनिधी)
advertisement
1/5

नारळ बारमाही मिळतं, परंतु श्रावणात त्याची विक्री आणि मागणी जास्त वाढते. सणावाराच्या निमित्तानं घरोघरी नारळाचे पदार्थ बनवले जातात, पूजेत नारळ वापरलं जातं.
advertisement
2/5
नारळात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन सीसह भरपूर मिनरल्स असतात. शिवाय ते चवीला भारी लागतं हे काही वेगळं सांगायला नको.
advertisement
3/5
कच्च नारळ रात्री झोपण्याच्या काही वेळआधी खाल्लं तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पोटाच्या अनेक विकारांवर आराम मिळतो. दुसऱ्या दिवशी पोट व्यवस्थित साफही होतं.
advertisement
4/5
झोपण्यापूर्वी कच्च <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/in-these-5-disease-people-avoid-coconut-water-it-can-be-harmful-for-health-mhnk-gh-1155207.html">खोबरं</a> खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यात असलेल्या फॅटमुळे शरिरातली कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. शिवाय <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/immunity-boosting-food-getting-sick-frequently-then-include-these-foods-in-diet-for-good-health-mhpj-1133826.html">रोगप्रतिकारक शक्ती</a> भक्कम होत असल्यामुळे विविध आजारांशी सामना करण्यासाठी शरीर तयार होतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/tag/health/">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
झोपण्याआधी थोडं खोबरं खा; सकाळी फ्रेश वाटेल, पोट झटक्यात होईल हलकं!