TRENDING:

Fruit Benefits in Winter: हिवाळ्यात फिट रहायचं आहे? मग खा ‘ही’ फळं; आजार पळतील दूर

Last Updated:
Fruits to keep you healthy in Winter: उत्तर भारतासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली आलाय. अवकाळी पावसानंतर थंडीने नाही तर थेट कडाक्याच्या थंडीने पुनरागमन केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा साथीच्या आजारांची भीती वाढली आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फळं खाणं फायद्याचं ठरतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती फळं खाल्ल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो.
advertisement
1/7
Fruit Benefits in Winter: हिवाळ्यात फिट रहायचं आहे?  खा ‘ही’ फळं; आजार पळतील दूर
हिवाळ्यात नासपती खाणं आरोग्यासाठी प्रचंड फायद्याचं आहे. नासपतीमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी याशिवाय अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय नासपतीत असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे विविध दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
advertisement
2/7
डाळिंबात विविध पोषक तत्वं आढळून येतात. रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करून कोलेस्टेरॉल कमी करायला रक्तदाब कमी करून हृदयाचं आरोग्य सुधारण्यात डाळिंब महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हिवाळ्यात डाळिंब खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
3/7
स्ट्रॉबेरी हे हिवाळ्यात येणारं आणि सगळ्यांना आवडणारं फळ आहे. अनेक जण स्ट्रॉबेरीच्या सीझनसाठी हिवाळ्याची वाट बघतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्ट्रॉबेरीत व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फोलेट, मँगनीज, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय स्ट्रॉबेरीजचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीसचे रूग्णही स्ट्रॉबेरी खाऊ शकतात.
advertisement
4/7
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, त्यात अनेक पोषक तत्वं आढळतात जी आरोग्यासाठी खूप फायद्याची आहेत. त्यामुळे हिवाळ्यात किवी खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
5/7
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय आणि व्हिटॅमिन सी युक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. त्यामुळे हिवाळ्यात संत्री आणि मोसंबी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारखे साथीचे आजार दूर करण्यात मदत करतात.
advertisement
6/7
पेरूमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी सोबतच फायबर, अँटिऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. हिवाळ्यात पेरू खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पचनाच्या तक्रारी दूर व्हायला मदत होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.
advertisement
7/7
सफरचंदातही व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे हिवाळ्यात सफरचंद खाल्ल्यामुळे त्वचेचं आरोग्य जपण्यापासून ते पोटाचं आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक फायदे होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fruit Benefits in Winter: हिवाळ्यात फिट रहायचं आहे? मग खा ‘ही’ फळं; आजार पळतील दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल