TRENDING:

Healthy Fats : वेट लॉससाठी फॅट्स खाणं बंदच केलंय? चूक टाळा, 'हे' 8 हेल्दी फॅट्स आहेत फायदेशीर

Last Updated:
Healthy Fats For Weight Management : सहसा लोकांचा असा गैरसमज असतो की, वजन कमी करण्यासाठी कॅलरी आणि फॅटयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. या चुकीच्या विचारामुळे आपण अनेकदा चांगल्या फॅटचे सेवन देखील कमी करतो, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु गुड फॅटमुळे शरीराला जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे सहजपणे शोषून घेण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुड फॅट असलेले पदार्थ कोणते आहेत ते सांगणार आहोत.
advertisement
1/9
वेट लॉससाठी फॅट्स खाणं बंदच केलंय? चूक टाळा, 'हे' 8 हेल्दी फॅट्स आहेत फायदेशीर
गुड फॅटमुळे हेल्दी पेशी तयार होतात, शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि त्वचेची चमक टिकून राहते. चला वजन कमी करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले हेल्दी फॅट असलेले 8 सर्वोत्तम पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
2/9
ॲव्होकाडो : ॲव्होकाडोमध्ये 80% फॅट असते, जे हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. हे मोनोअनसॅचुरेटेड फॅटचा एक चांगला स्रोत आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
advertisement
3/9
सोया मिल्क : सोया मिल्क गुड फॅटचा उत्तम स्रोत आहे, ज्यामध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅट आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला खूप मदत होते.
advertisement
4/9
फॅटी फिश : सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यांसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे गुड फॅट त्वचा आणि एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
advertisement
5/9
व्हेजिटेबल ऑइल आणि तूप : जैतूनचे तेल, सूर्यफूल तेल किंवा कॅनोला तेल यामध्ये गुड फॅट भरपूर प्रमाणात असते. तुम्ही यांचा वापर स्वयंपाकासाठी करू शकता. याशिवाय तुपामध्ये देखील हेल्दी फॅट असते.
advertisement
6/9
सुकामेवा : बदाम, अक्रोड आणि काजू ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि इतर हेल्दी फॅटचा उत्कृष्ट स्रोत आहेत. तुमच्या आहारात या सुकामेव्याचा समावेश केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.
advertisement
7/9
ऑलिव्ह : ऑलिव्हमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट असते, जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. याच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
advertisement
8/9
दही : संशोधनात असे आढळून आले आहे की, दहीमध्ये प्रोबायोटिक, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट असते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
advertisement
9/9
चिया सीड्स : 28 ग्रॅम चिया सीड्समध्ये जवळपास 11 ग्रॅम हेल्दी फॅट असते, जे वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करते. तुमच्या आहारात चिया सीड्सचा समावेश केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Fats : वेट लॉससाठी फॅट्स खाणं बंदच केलंय? चूक टाळा, 'हे' 8 हेल्दी फॅट्स आहेत फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल