कशाला हवं फेशियल? दररोज लावा कोरफड गर, हिऱ्यासारखा चमकेल चेहरा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडाच्या गराचा समावेश असतो. अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी हा गर वापरला जातो. ब्युटी एक्स्पर्ट पुष्पा सांगतात की, सौंदर्य प्रसाधनांमधून वापरण्यापेक्षा कोरफडाचा गर थेट वापरला तर त्याचे त्वचेला आणि केसांना विशेष फायदे मिळतात.
advertisement
1/5

कोरफड गरात 99% पाणी असतं. ज्यामुळे त्वचा खोलवरून हायड्रेटेड होते. परिणाम त्वचेला ओलावा मिळाल्याने ती मऊ आणि चमकदार दिसते. कोरफड गरात अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे पिंपल रोखण्यास मदत होते.
advertisement
2/5
कोरफडाच्या गरात व्हिटॅमिन सी आणि ईसह बीटा कॅरेटिन असतं. म्हणूनच त्यातून त्वचेला भरपूर पोषण मिळतं. या गरामुळे त्वचा स्वच्छ होते, त्वचेवरील जंतू मरून जातात. परिणामी त्वचा केवळ मऊ होत नाही, तर सुरकुत्याही हळूहळू कमी होतात.
advertisement
3/5
दररोज कोरफडाचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग फिकट होऊन त्वचेचा रंग एकसमान होण्यास मदत मिळते. शिवाय चेहरा छान उजळतो.
advertisement
4/5
दररोज सकाळी चेहरा धुवून कोरफडाचा ताजा गर लावावा. गराने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी. मग 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. असं नियमितपणे केल्यास काहीच आठवड्यांमध्ये आपल्याला चेहऱ्यात <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/best-oil-to-stop-hair-fall-you-can-make-at-home-full-recipe-mhij-1218652.html">फरक दिसून येईल</a>.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/best-home-remedy-to-get-rid-of-kidney-stones-mhij-1218697.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/have-you-tried-ghee-in-coffee-doctor-tina-says-it-has-benefits-mhij-1218291.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
कशाला हवं फेशियल? दररोज लावा कोरफड गर, हिऱ्यासारखा चमकेल चेहरा!