पावसात पाणीपुरी खायची हौस पाडू शकते आजारी! खायचीच असेल तर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका प्रचंड असतो. काही आजारांची लागण पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणावर होते. टायफॉइडही त्यापैकीच एक. हा आजार होऊ नये यासाठी नेमकं काय करावं, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5

डॉ. वीके पांडे सांगतात की, पावसाळ्यात टायफॉइड होण्याचा धोका मोठा असतो. या काळात ऊन कमी पडतं, त्यामुळे दमट वातावरणात विषाणू बराच काळ टिकून राहतात.
advertisement
2/5
टायफॉइड घाणेरड्या पाण्यामुळे होतो. म्हणूनच पावसाळ्यात चुकूनही पाणीपुरी खाऊ नये. अगदी राहवतच नसेल तर घरी पाणीपुरी बनवून खावी.
advertisement
3/5
डॉ. वीके पांडे सांगतात, केवळ खराब पाणी प्यायल्यानंच आजार होतात असं नाही, तर अनेकदा लोक कुठूनही येतात आणि जेवायला बसतात. हेसुद्धा <a href="https://news18marathi.com/web-stories/local18/local18-is-tea-on-an-empty-stomach-causing-cancer-l18w-mhij-2345381/">आजारपणाचं कारण ठरू शकतं</a>.
advertisement
4/5
हातातली घाण पोटात जाऊ शकते. पोटात घाण जाणं हे टायफॉइड होण्याचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/vegetarian-food-that-tastes-like-non-vegetarian-food-mhij-1228606.html">घरचंच जेवण जेवावं</a> आणि जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवावे.
advertisement
5/5
जंक फूड आरोग्यासाठी घातक असतंच, मात्र पावसाळ्यात तर हे पदार्थ कटाक्षानं टाळावे. कारण यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/boost-your-immune-system-without-medicines-l18w-mhij-1229568.html">रोगप्रतिकारक शक्ती</a> कमकुवत होऊ शकते. परिणामी विविध आजार जडू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पावसात पाणीपुरी खायची हौस पाडू शकते आजारी! खायचीच असेल तर...