Dark Circles: डोळ्यांभोवतीचे काळे घेर पूर्ण होतील नष्ट! घरच्या घरी करा सोपा उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डार्क सर्कल्स बऱ्याचदा आपल्या सौंदर्यात अडथळे ठरतात. डार्क सर्कल्समुळे आपला चेहरा झोपाळू आणि थकलेला दिसतो, शिवाय वयही जास्त दिसू शकतं. अनेकजण डार्क सर्कल्स घालवण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु आराम काही मिळत नाही. त्यामुळे आज आपण घरच्या घरी डार्क सर्कल्स कसे घालवायचे, यासाठी काही खास रामबाण, सोपे उपाय पाहणार आहोत. (अकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/6

बटाट्याला नॅचरल ब्लिच म्हणतात. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी कच्चा बटाटा घासून त्यातून निघणारा रस डोळ्यांभोवती कापसाने लावा. दररोज 10 मिनिटं हा उपाय केल्याने काही दिवसांतच आपले डार्क सर्कल्स कमी होतील.
advertisement
2/6
कोरफड त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतं. कोरफडाच्या गराने डोळ्यांभोवती 5 ते 7 मिनिटांसाठी मसाज करावी. रात्रभर हा गर तसाच ठेवून सकाळी चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात.
advertisement
3/6
संत्र्याची साल कडक उन्हात सुकवून मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर गुलाबपाण्यात मिसळून डोळ्यांभोवती लावल्यास डार्क सर्कल्स अगदी कायमचे नष्ट होतात आणि डोळे छान फ्रेश दिसतात.
advertisement
4/6
डोळ्यांखालचे काळे घेर जावे यासाठी हळद, मध आणि कॉफीचं एकजीव मिश्रण करून डोळ्यांखाली लावावं. 15 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्याभरातून 3 वेळा हा उपाय केल्याने डार्क सर्कल्स नष्ट होतात.
advertisement
5/6
बदामाच्या तेलात <a href="https://news18marathi.com/web-stories/local18/local18-these-glossy-yellow-flowers-are-helpful-for-type-2-diabetes-l18w-mhij-2178403/">व्हिटॅमिन</a> ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ते <a href="https://news18marathi.com/web-stories/local18/local18-lychee-can-make-your-skin-young-and-glowing-l18w-mhij-2174814/">त्वचेसाठी फायदेशीर</a> ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेलाच्या काही थेंबांनी व्यवस्थित मालिश करावी. 15 दिवसांच्या या उपायाने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/reasons-why-you-should-drink-coffee-in-morning-mhij-1198000.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dark Circles: डोळ्यांभोवतीचे काळे घेर पूर्ण होतील नष्ट! घरच्या घरी करा सोपा उपाय