TRENDING:

Ghee : तूप आरोग्यासाठी लाभदायी, पण खाण्याची पद्धत माहित हवी! लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी

Last Updated:
तूप हा पदार्थ केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नाही तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप चांगला आहे. तूपात कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात जे तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु तूप आपण खिचडी, मोदक, पुरणपोळी अशा ठराविक पदार्थांवरच खातो. तेव्हा तूप खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
advertisement
1/5
तूप आरोग्यासाठी लाभदायी, पण खाण्याची पद्धत माहित हवी! लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी
तूप खाताना ते नेहमी कोणत्यातरी गरम पदार्थांसोबतच खाणे योग्य असते. गरम डाळभात, खिचडी किंवा यांसारखे पदार्थ बनवल्यानंतर ते पदार्थ गरम असतानाच त्यावर तूप घालूंन खावे. तूप गरम पदार्थांसोबतच खाल्ल्याने ते आपल्या अन्ननलिकेत चिकटून न बसता व्यवस्थित पोटांत जातात. तसेच गरम पदार्थांसोबत तूप खाल्ल्याने, तूप पचनास अधिक मदत होते. यामुळे तूप खाताना ते कायम गरम पदार्थांसोबत किंवा गरम पाण्यांत मिसळून खाणे योग्य ठरेल.
advertisement
2/5
सध्या पदार्थाचे गुणधर्म न पाहता त्याला कोणत्याही पदार्थासोबत खाणे हा ट्रेंड वाढत आहे. परंतु तुपासोबत असे करणे टाळावे. मध आणि तूप एकत्रित करुन खाणे टाळावे तसेच तूप आणि मध टाकलेले पदार्थ देखील एकत्र खाणे टाळावे. तूप आणि मध हे विसंगत पदार्थ आहेत त्यामुळे तूप आणि मध एकत्रित करुन खाणे टाळावे.
advertisement
3/5
तूप आवडत म्हणून भरपूर प्रमाणांत खाण योग्य नाही. याचबरोबर दिवसाच्या कोणत्याही वेळी तूप खाणे ही योग्य पद्धत नाही. तूप खाताना ते प्रत्येक दिवशी योग्य त्या प्रमाणातच खायला हवे यामुळे त्याचे गुणधर्म शरीराला मिळतात आणि आरोग्य चांगले राहते.
advertisement
4/5
रोज जास्त तूप किंवा तुपाचे पदार्थ खाणं शरीरासाठी चांगलं नाही. तूप हे एक हाय कॅलरी फूड आहे. दिवसभरात केवळ 1 ते 2 चमचे तूप प्रत्येक व्यक्तीने खाणे योग्य ठरते.
advertisement
5/5
तूप खाताना शक्यतो ते दुपारच्या जेवणासोबतच खाणे योग्य आहे. दुपारच्या जेवणासोबत जेवण गरम असताना त्यावर तूप टाकून, जेवणाचा पहिला घास घेताना सर्वप्रथम तूप खाल्ले जाईल असे बघावे. जेवणाच्या पहिल्या घासासोबत तूप खाल्ल्याने आपल्या पोटातील अग्नी हा व्यवस्थित प्रज्वलित होऊन अन्न आणि तूप हे दोन्ही चांगल्या पद्धतीने पचवले जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee : तूप आरोग्यासाठी लाभदायी, पण खाण्याची पद्धत माहित हवी! लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल