TRENDING:

Kitchen Tips : चपाती-भाकरीच्या साध्या तव्यावर डोसा कसा बनवायचा? चिकटणार नाही, क्रिस्पीही होईल

Last Updated:
Making Dosa on Regular Chapati Pan : चपाती–भाकरीच्या लोखंडी तव्यावर डोसा बनवणं अवघड नाही, फक्त योग्य पद्धत माहित असायला हवी. नॉनस्टिक तव्याशिवायहीकुरकुरीत डोसा सहज तयार होतो.
advertisement
1/7
चपाती-भाकरीच्या साध्या तव्यावर डोसा कसा बनवायचा? चिकटणार नाही, क्रिस्पीही होईल
डोसा म्हटलं की त्यासाठी खास पॅन हवा किंवा अनेकांना नॉनस्टिक तवा आठवतो. पण अगदी चपाती–भाकरीच्या साध्या लोखंडी तव्यावरही उत्तम, कुरकुरीत डोसा बनवता येतो. फक्त योग्य पद्धत आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
2/7
डोसा चिकटतो याचं कारण तवा फार गरम आहे, तेव्हा फ्लेम कमी करा. डोसा पसरत नसेल तर पीठ घट्ट आहे, त्यात थोडं पाणी घाला. पीठ खूप पातळ नको नाहीतर ते तव्याला चिकटतं. खूप घट्टही नको, नाहीतर पसरत नाही. पहिला डोसा खराब जातो, हे अगदी नॉर्मल आहे कराण तवा सेट व्हायला वेळ लागतो.
advertisement
3/7
डोसा चिकटू नये यासाठी तवा योग्य प्रकारे तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. तवा आधी मध्यम आचेवर चांगला तापवा. तव्यावर 2–3 थेंब पाणी टाका. पाणी लगेच उडून गेलं तर तवा तयार आहे. आता फ्लेम थोडी कमी करा. खूप गरम तव्यावर पीठ टाकल्यास डोसा चिकटतो.
advertisement
4/7
एक जुना पण खात्रीशीर उपाय तो म्हणजे अर्धा कांदा घ्या तो तेलात बुडवून तो तव्यावर फिरवा. तव्यावर गोलाकार फिरवत हलक्या हाताने घासा. यामुळे तव्यावर तेलाचा पातळ थर बसतो आणि डोसा सहज सुटतो. कांदा नसेल तर ओल्या कपड्यावर थोडं तेल घेऊन तवा पुसू शकता.
advertisement
5/7
आता तव्याच्या मधोमध एक पळी पीठ ओता. पळीने मधोमध सुरू करून हळूहळू बाहेरच्या बाजूला गोल फिरवा. फार दाब देऊ नका. तव्यावर हलक्या हाताने पसरवलेला डोसा चांगला येतो. डोसा पसरवल्यावर लगेच कडांवर आणि मधोमध थोडंसं तेल सोडा. जास्त तेल घातल्यास डोसा तव्यावर घसरतो आणि नीट शिजत नाही.
advertisement
6/7
कडा वर येऊ लागल्या की डोसा शिजायला लागल्याचं लक्षण आहे. साधा डोसा असेल तर एकाच बाजूने शिजवणं पुरेसं असतं. अधिक कुरकुरीत हवा असेल तर थोडा वेळ उलटा करून घ्या. उलटताना कडा सुटल्या आहेत याची खात्री करा.
advertisement
7/7
प्रत्येक डोशानंतर तवा ओल्या कपड्याने हलकासा पुसा. त्यामुळे तापमान कमी होतं आणि पुढचा डोसा नीट पसरतो. पुन्हा कांदा किंवा तेलाचा हलका हात फिरवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : चपाती-भाकरीच्या साध्या तव्यावर डोसा कसा बनवायचा? चिकटणार नाही, क्रिस्पीही होईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल