पावसाळ्यात जास्त AC वापरत नाही, पण जर असं काही होत असेल समजा भंगार झाला एसी!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
जर तुमचा एसी वारंवार दुरुस्त करावा लागत असेल आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असेल तर नवीन एसी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे, असं समजावं
advertisement
1/6

उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी घरी तसेच ऑफिसमध्ये एअर कंडिशनर अर्थात एसी बसवला जातो. एसी दीर्घकाळ सुस्थितीत राहावा यासाठी त्याची नियमित सर्व्हिसिंग गरजेची असते. एसीतून चांगला गारवा मिळावा यासाठी त्यात ठराविक कालावधीनंतर गॅस भरावा लागतो. पण जर एसीमधून गॅस वारंवार लीक होत असेल तर ही एक गंभीर समस्या आहे. याचा अर्थ एसी रिप्लेस करण्याची गरज आहे असं समजावं. एसीतून गॅस लीक होणं तसेच त्यात वारंवार बिघाड होत असेल तर नेमकं काय करावं?
advertisement
2/6
एसीतून वारंवार गॅस लिकेज होत असेल तर ही गंभीर समस्या मानली जाते. जर ही समस्या सतत उद्भवत असेल तर एसी रिप्लेस करण्याची वेळ आली आहे, असं समजावं. तसेच एसी आता निकामी झाला असून तो बदलण्याची वेळ आली आहे, हे देखील काही समस्यांवरून दिसून येतं.
advertisement
3/6
गॅस भरून देखील एसी योग्य पद्धतीनं कूलिंग देत नसेल तर सिस्टीममध्ये लिकेज किंवा अन्य समस्या असल्याचे हे संकेत असतात. जर तुमचा एसी खूप जुना म्हणजेच 10 ते 15 वर्षांपूर्वीचा असेल तर ही समस्या सामान्य असू शकते. जुना एसी मेंटेन करणं खर्चिक असतं. त्यामुळे अशा स्थितीत नवीन एसी खरेदी करणं हा एकमेव पर्याय योग्य ठरतो.
advertisement
4/6
जर वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा एसीतून गॅस लीक होत असेल तर तुमच्या एसीत मोठी बिघाड असल्याचे हे संकेत असू शकतात. एसी चांगल्या स्थितीत असेल तर त्यातील गॅस लीक न होता, तो वर्षानुवर्ष चांगला कार्यरत राहतो.
advertisement
5/6
जर तुमचा एसी वारंवार दुरुस्त करावा लागत असेल आणि दुरुस्तीचा खर्च वाढत असेल तर नवीन एसी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे, असं समजावं. जर एसी जास्त प्रमाणात विजेचा वापर करून देखील योग्य प्रमाणात कुलिंग देत नसेल तर हे एसीच्या सिस्टीममध्ये मोठा बिघाड असल्याचे संकेत समजावेत.
advertisement
6/6
जर तुम्हाला तुमच्या एसीमध्ये या समस्या दिसत असतील तर नवीन एसीसाठी गुंतवणुकीचा विचार करावा. नवीन एसी खरेदी केला तर कूलिंग चांगले मिळेल, विजेची बचत होईल आणि मेंटेनन्ससाठी खर्च देखील कमी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पावसाळ्यात जास्त AC वापरत नाही, पण जर असं काही होत असेल समजा भंगार झाला एसी!