ही आहे भारतातील सर्वात महागडी टॉफी, फक्त 3 महिने उपलब्ध, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तुम्ही अनेक फ्लेवरच्या टॉफी (चॉकलेटचा प्रकार) खाल्ल्या असतील. तसेच बाजारात त्यांची किंमतही प्रत्येकी एक रुपया असते. मात्र, एका ठिकाणी उन्हाळ्यात खास टॉफी बनवली जाते. या टॉफीची किंमत इतकी जास्त आहे की, या एका टॉफीमध्ये 20 टॉफी येऊ शकतात. (निखिल स्वामी/प्रतिनिधी, बिकानेर)
advertisement
1/4

राजस्थानच्या बिकानेरमध्ये ही टॉफी तयार केली जाते. बिकानेरमधीलच नव्हे तर भारतातील ही सर्वात महागडी टॉफी आहे. आंबा फ्लेवरची ही टॉफी या दिवसात खूपच चालते. फक्त 3 महिने ही टॉफी बाजारात मिळते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही टॉफी आवडते.
advertisement
2/4
दुकानदार रूपेश अग्रवाल यांनी सांगितले की, ही टॉफी सर्वात महाग असून उन्हाळ्यात उपलब्ध असते. ही टॉफी आमरसापासून बनवली जाते. आंब्याचा रस आणि साखरेचा वापर ही टॉफी तयार करण्यासाठी केला जातो. उन्हाळ्यात या मँगो टॉफीला खूप मागणी असते. ही टॉफी मे, जून आणि जुलैमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
3/4
20 रुपयांना एक टॉफी मिळते. हाफूस आंब्यापासून ही टॉफी बनवली जाते. ही टॉफी बनवण्यासाठी सुमारे 4 ते 5 तास लागतात. ही मँगो टॉफी चांगल्या क्वालिटीची असते.
advertisement
4/4
बाजारात या टॉफीचे पॅकेट 600 रुपयांना विकले जात आहे. ही टॉफी खायला चविष्ट असते आणि खूप सॉफ्ट असते. यामुळे कुणीही ही टॉफी खाऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ही आहे भारतातील सर्वात महागडी टॉफी, फक्त 3 महिने उपलब्ध, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित