Milk Fact : म्हशीच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? गायीचे दूध पिवळसर दिसण्यामागचं नेमकं कारण काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जगातील बहुतांश लोक गाय किंवा म्हशीचं दूध पितात. तुम्ही कधी नीट निरखून पाहिलं आहे का, की दुधाचा रंग नेहमी शुभ्र पांढरा (Pure White) च का असतो? लाल, हिरवा किंवा इतर रंगाचा का नाही?
advertisement
1/10

दुध आरोग्यासाठी चांगलं असल्यामुळे तज्ज्ञ ते दररोज पिण्याचा सल्ला देतात. लहान मुलांना तर कॅल्शिमसाठी दूध आवर्जून देण्यासाठी डॉक्टर सांगतात. काही लोक दूध पित नाहीत, पण असं असलं तरी देखील त्यांना सकाळी दुधाचा चहा आवर्जून लागतो. त्यामुळे प्रत्येक घरात दुध हे आणलं जातंच. सकाळच्या चहामध्ये असो किंवा रात्रीच्या जेवणासोबत, दूध (Milk) आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
2/10
जगातील बहुतांश लोक गाय किंवा म्हशीचं दूध पितात. तुम्ही कधी नीट निरखून पाहिलं आहे का, की दुधाचा रंग नेहमी शुभ्र पांढरा (Pure White) च का असतो? लाल, हिरवा किंवा इतर रंगाचा का नाही?
advertisement
3/10
लहानांपासून मोठ्यांना कधीकधी असा प्रश्न नक्की पडतो की गाय-म्हैस हिरवा चारा खातात, तरी त्यांचे दूध पांढरं कसं होतं? चला तर मग, आज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं अगदी सोपं आणि रंजक उत्तर जाणून घेऊया.
advertisement
4/10
दूध म्हणजे नेमकं काय?सुरुवातीला, दूध म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दूध म्हणजे एक प्रकारचं पायस (Emulsion) आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पाण्यात लहान-लहान स्निग्ध कण (Milk Fat Globules) मिसळून हा द्रव तयार होतो. या द्रव्यात केवळ पाणी आणि फॅट नाही, तर लॅक्टोज (Lactose - साखर), प्रथिने (Proteins), खनिजे (Minerals) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. याच घटकांमध्ये दुधाचा रंग पांढरा असण्याचं रहस्य दडलं आहे.
advertisement
5/10
पांढऱ्या रंगाचं 'हे' आहे वैज्ञानिक कारणदूध पांढरं दिसण्यामागे एक खास वैज्ञानिक कारण आहे 'केसीन' (Casein). केसीन हे दुधामध्ये आढळणाऱ्या मुख्य प्रथिनांपैकी एक आहे. हे केसीन प्रथिन दुधामध्ये उपस्थित असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फेट (Phosphate) सोबत एकत्र येऊन 'मिसेल' (Micelle) नावाचे अत्यंत छोटे कण तयार करते.
advertisement
6/10
प्रकाश आणि मिसेलचा खेळ: जेव्हा या मिसेल कणांवर प्रकाश पडतो, तेव्हा हे कण प्रकाश शोषून न घेता, त्याला सर्व दिशांना अपवर्तित (Refract) करतात आणि विखुरतात (Scatter). याचमुळे प्रकाशाचं हे विखुरणं (Light Scattering) होतं आणि मानवी डोळ्यांना ते दूध पांढरं दिसतं.
advertisement
7/10
याशिवाय, दुधामध्ये असलेल्या स्निग्धतेमुळे (Fat) देखील त्याचा रंग पांढरा दिसतो. दुधात फॅटचे प्रमाण जितकं जास्त, ते दूध तितकं जास्त पांढरं आणि दाट दिसतं. याउलट, कमी फॅट असलेलं दूध (Low-fat milk) कधीकधी हलकंसं फिकट किंवा निळसर (Slightly dull or bluish) दिसू शकतं.
advertisement
8/10
मग गायीचं दूध पिवळसर का दिसतं?तुम्ही पाहिलं असेल की म्हशीचं दूध अगदी शुभ्र पांढरं दिसतं, पण गायीचं दूध मात्र हलकं पिवळसर (Yellowish) रंगाचं असतं. यामागचं कारणही विज्ञानात दडलेलं आहे आणि ते आहे एक खास प्रथिनं आहे.
advertisement
9/10
गायीच्या दुधात कॅरोटीन (Carotene) नावाचं एक प्रथिन अधिक प्रमाणात आढळतं. हेच कॅरोटीन गाजर (Carrot) किंवा पपईला (Papaya) पिवळा-नारंगी रंग देतं. गाय हिरवा चारा खाल्ल्यानंतर, तिच्या शरीरात या कॅरोटीनचं काही रूपांतर व्हिटॅमिन 'ए' मध्ये होतं, पण काही भाग दुधात तसाच राहतो. या कॅरोटीनच्या उपस्थितीमुळेच गायीच्या दुधाला म्हशीच्या दुधापेक्षा थोडा अधिक पिवळसर रंग येतो.
advertisement
10/10
म्हशीच्या दुधात कॅरोटीनचं प्रमाण कमी असतं आणि त्यात स्निग्धता (फॅट) देखील जास्त असते, ज्यामुळे ते अधिक पांढरं दिसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Milk Fact : म्हशीच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? गायीचे दूध पिवळसर दिसण्यामागचं नेमकं कारण काय?