TRENDING:

पार्लर, सलूनमधील मसाज जीवघेणा! बाणेरचे डॉक्टर म्हणाले, 80% लोकांना मृत्यूचा धोका

Last Updated:
Deadly Massage : मसाज करवून घेतला, मान मोडली की अनेकांना बरं वाटतं. मोकळं मोकळं वाटतं. पण त्याचे परिणाम नंतर भयंकर असू शकतात. याबाबत पुण्याच्या बानेरमधील डॉक्टरांनी एका प्रकरणाबाबत सांगत सावध केलं आहे.
advertisement
1/7
पार्लर, सलूनमधील मसाज जीवघेणा! बाणेरचे डॉक्टर म्हणाले, 80% लोकांना मृत्यूचा धोका
बरेच लोक पार्लर, सलूनमध्ये जातात. काही जण खास मसाज घ्यायला जातात. सलूनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मानेला मसाज देताना मान मोडली जाते. पण पार्लर, सलूनमधील असा मसाज जीवघेणा ठरू शकतो. डॉक्टरांनी याबाबत सावध केलं आहे. बानेरच्या डॉक्टरांनी यामुळे 80 टक्के लोकांना मृत्यूचा धोका असल्याचा दावा केला आहे.
advertisement
2/7
मसाज करवून घेतला, मान मोडली की अनेकांना बरं वाटतं. मोकळं मोकळं वाटतं. पण त्याचे परिणाम नंतर भयंकर असू शकतात. याबाबत पुण्याच्या बानेरमधील इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष पाटील यांनी सावध केलं आहे. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या एका प्रकरणाबाबत सांगितलं आहे.
advertisement
3/7
डॉ. संतोष पाटील यांनी सांगितलं की, ब्युटी पार्लर शिकणारी एक तरुणी माझ्याकडे आली होती. तिथं त्या एकमेकांवर ट्रेनिंग करत होत्या. रात्री तिला गंभीर स्ट्रोक झाला. मागे छोट्या मेंदूला जाणारी रक्तवाहिनी असते ती आपल्या ब्रेन स्टेमला सप्लाय करते ती बंद झाली होती.
advertisement
4/7
अशी परिस्थिती म्हणजे कोमा. रुग्ण कोमात जातो आणि 80 टक्के रुग्ण दगावतात. सुदैवाने या प्रकरणात या मुलीला वाचवता आलं. तिच्या मानेतील रक्तवाहिनीतील क्लॉट आम्ही काढले, असं डॉ. पाटील म्हणाले.
advertisement
5/7
सलूनमध्ये मसाज करून घेणं, मान मोडून घेणं हा खूप घातक प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं.. मेंदूत असलेल्या रक्तवाहिन्या आपल्या हृदयाकडून निघून मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूत त्या हाडांच्या आतून जातात त्यामुळे तिथं त्या स्थिर असतात. पण मानेच्या जागेत त्या हलत्या असतात.
advertisement
6/7
त्यामुळे मानेत दाब आला की रक्तवाहिन्याच्या आतील लेअर्सवर परिणाम होतो. याला आपण पडदा फाटतो असं म्हणतो त्याच्यामुळे रक्तप्रवाह बंद होतो मग स्ट्रोक होतो, असं डॉ. संतोष पाटील यांनी सांगितलं.
advertisement
7/7
त्यामुळे मानेत दाब आला की रक्तवाहिन्याच्या आतील लेअर्सवर परिणाम होतो. याला आपण पडदा फाटतो असं म्हणतो त्याच्यामुळे रक्तप्रवाह बंद होतो मग स्ट्रोक होतो, असं डॉ. संतोष पाटील यांनी सांगितलं. पुण्याच्या बानेरमधील इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष पाटील यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पार्लर, सलूनमधील मसाज जीवघेणा! बाणेरचे डॉक्टर म्हणाले, 80% लोकांना मृत्यूचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल