डाळ, आमटी, भाजीला दिलेल्या फोडणीमुळे बिघडतंय तुमचं आरोग्य; डॉक्टरांनी सांगितलं कसं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Phodni Destroy Health : फोडणीमध्ये आपण असे पदार्थ वापरतो जे आरोग्यासाठी चांगले असतात. असं असताना एका डॉक्टरने मात्र फोडणीमुळे आरोग्य बिघडत असल्याचं सांगितलं आहे, ते कसं हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
1/5

डाळ, आमटी, भाजी बनवायचं म्हटलं की त्याला फोडणी आलीच. फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण, कांदा, टोमॅटो असे पदार्थ वापरले जातात.
advertisement
2/5
फोडणीमुळे त्या पदार्थाची चव वाढतेच. पण ही फोडणी आरोग्यदायी असते असंही सांगितलं जातं. कारण फोडणीत वापरलेल्या साहित्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
advertisement
3/5
अशी आरोग्यदायी असलेली फोडणी तुमचं आरोग्य बिघडवते आहे, असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही आश्चर्य वाटेल. पण एका डॉक्टरने हे सांगितलं आहे.
advertisement
4/5
डॉक्टरांनी सांगितलं की, फोडणी देताना जर तुम्ही चिमणी, एक्झॉट फॅन सुरू ठेवला नाही, खिडकी उघडी ठेवली नाही, तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
5/5
बंद रूममध्ये फोडणीचा धूर बाहेर न जाता आतच कोंडतो आणि श्वासावाटे तो आपल्या शरीरात जातो, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो, असं डॉ. तरंग कृष्णा यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
डाळ, आमटी, भाजीला दिलेल्या फोडणीमुळे बिघडतंय तुमचं आरोग्य; डॉक्टरांनी सांगितलं कसं