TRENDING:

काय! तुम्ही झोपताय ती उशी टॉयलेट सीटपेक्षाही घाण, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती 

Last Updated:
Pillows dirty than toilet seat : आपल्या डोक्याखालील उशी ही टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरडी असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
advertisement
1/5
तुम्ही झोपताय ती उशी टॉयलेट सीटपेक्षाही घाण, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
आपल्यापैकी बहुतेक जण झोपताना डोक्याखाली उशी घेतात. पण याच उशीबाबत संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या डोक्याखालील उशी ही टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरडी असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. आपली उशी तर स्वच्छ दिसते आहे मग ती टॉयलेट सीटपेक्षा घाण कशी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
2/5
अमेरिकेतील मॅट्रेस आणि बेडिंग कंपनी अमेरिस्लीपने हे संशोधन केलं. संशोधनातून असं दिसून आलं आहे की बेडिंगमध्ये आपण दररोज येणाऱ्या काही सर्वात दूषित पृष्ठभागांइतकेच बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, ज्यात टॉयलेट सीट, टूथब्रश आणि पाळीव प्राण्यांचे भांडे यांचा समावेश आहे.
advertisement
3/5
अमेरिसलीपने तीन सदस्यांच्या मदतीने हा अभ्यास केला. त्यांनी त्यांना चार आठवडे त्यांच्या चादरी आणि उशाचे कव्हर धुण्यास सांगितलं. दर आठवड्याला नमुने गोळा केले जात होते आणि बॅक्टेरियाची पातळी मोजण्यासाठी चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्याचे निकाल धक्कादायक होते.
advertisement
4/5
फक्त एका आठवड्यानंतर उशाच्या कव्हरमध्ये प्रति चौरस इंचात सरासरी 3 दशलक्ष कॉलनी-फॉर्मिंग युनिट्स (CFU) बॅक्टेरिया असल्याचं आढळून आलं. हे प्रमाण टॉयलेट सीटवर आढळणाऱ्या बॅक्टेरियापेक्षा 17000 पट जास्त आहे. चौथ्या आठवड्यापर्यंत, उशाच्या कव्हरमध्ये जवळजवळ 1.2 कोटी CFU होते. जे पाळीव प्राण्यांच्या बाउलपेक्षा 39 पट जास्त आहे.
advertisement
5/5
अभ्यासात यामध्ये चार सामान्य बॅक्टेरियाचे प्रकार दिसून आहे. ज्यापैकी काही हानिकारक होते तर काही हानिकारक नाही. तरी काळजी घ्यायलाच हवी. जर तुम्ही आठवड्यातून एकदाही तुमच्या उशांचे कव्हर धुत नसाल तर बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होईल. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी तुमचे बेडिंग धुण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
काय! तुम्ही झोपताय ती उशी टॉयलेट सीटपेक्षाही घाण, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल