TRENDING:

नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार करा ‘ही’ पौष्टिक रेसिपी; बनवण्याची पद्धत पाहा

Last Updated:
नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार होणाऱ्या पौष्टिक धिरड्याची रेसिपी सांगणार आहोत.
advertisement
1/6
नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार करा ‘ही’ पौष्टिक रेसिपी; बनवण्याची पद्धत पाहा
रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, डोसा असे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पौष्टिक आणि सकस आहार असणारे खाद्यपदार्थ आपण खाणे विसरून गेले आहोत.
advertisement
2/6
पौष्टिक आहार शरीराला मिळाला मिळत नसल्याने शारीरक व्याधींनाही सामोरं जावं लागतं. आज तुम्हाला नाश्त्यासाठी अवघ्या पाच मिनिटात तयार होणाऱ्या पौष्टिक धिरड्याची रेसिपी सांगणार आहोत. बीडमधील गृहिणी दिपाली पाटील यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/6
आजही ग्रामीण भागामध्ये धिरडं आवडीने बनवलं आणि खाल्लं जातं. पारंपरिक धिरड्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. गव्हाच्या पिठात लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि इतर साहित्य घालून त्यामध्ये पाणी घालून पौष्टिक धिरडे तयार केले जाते. गावाकडे आवर्जून धिरडं बनवलं जातं आणि दही, उसळ किंवा चटणीसोबत खाल्लं जातं. नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
4/6
धिरडं बनवण्यासाठी अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धा कप दही, एक चमचा आले लसूण पेस्ट, एक चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची आणि हिरवे धणे पेस्ट, एक चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, किसलेले खोबरे, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी हे साहित्य आवश्यक असते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य किचनमध्ये उपलब्धच असतं.
advertisement
5/6
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, दही, मीठ, जिरे, हळद, आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि धणे पेस्ट घाला. सर्व साहित्य नीट मिसळा आणि नंतर थोडे थोडे पाणी घालून डोस्यासारखे पीठ बनवा. तव्याला गरम करा, तव्याला थोडं तेल घालून ग्रीस करा आणि नंतर थोडं पाणी शिंपडून तव्याचे तापमान कमी करा. नंतर पीठ ओता.
advertisement
6/6
तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते लहान किंवा मोठे करू शकता. पिठाच्या एका बाजूला थोडेसे तेल टाका आणि नंतर उलटा करा. दुसरी बाजू देखील सोनेरी आणि किंचित कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्याचप्रमाणे इतर धिरडे बनवा आणि गरमागरम टोमॅटो सॉस दही किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार करा ‘ही’ पौष्टिक रेसिपी; बनवण्याची पद्धत पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल