मसाला डोसा आता विसरा, अस्सल घरगुती मसाल्यांपासून तयार केलेला हा पदार्थ खाऊन पाहाच
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
घरगुती मसाल्यापासून गावरान पद्धतीने तयार केलेले धिरडं खाण्यासाठी खवय्यांची इथं गर्दी असते.
advertisement
1/5

गाव, शहर आणि परिसर बदलला की त्या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांमध्येही बदल होतात. काही ठिकाणी तिखट पदार्थ आवडीनं खाल्ले जातात. तर काही भागात गोड पदार्थांना अधिक मागणी असते. जिल्हा बदलला की तेथील खाद्यसंस्कृती बदलते.<a href="https://news18marathi.com/maharashtra/beed/"> बीड</a> जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती फेमस आहे. बीडमध्ये खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणारे अनेक पदार्थ मिळतात.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यात बदलत्या शहरी संस्कृतीमध्ये मिळणारे फास्ट फुड तर मिळतेच. त्याचबरोबर काही ग्रामीण भागातील पदार्थही मिळतात. बीड शहरातील मोंढा परिसरात काही हॉटेल प्रसिद्ध असून त्यामधील मीनाक्षी या हॉटेलमधील घरगुती मसाल्यापासून गावरान पद्धतीने तयार केलेले धिरडं खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.
advertisement
3/5
बीडच्या मोंढा परिसरामध्ये शेतकरी आणि कामगारांची नेहमी वर्दळ असते. कमी वेळात तयार होईल आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ द्यावा असं हॉटेल मालक भानुदास गडगिळे यांना वाटलं. त्यामधूनच त्यांनी धिरडं आणि शेंगदाण्याची चटणी हा पदार्थ देण्यास सुरुवात केली, अशी माहिती या हॉटेलचे सध्याचे मालक नितिन गडगिळे यांनी दिली.
advertisement
4/5
सुरुवातीला या धिरड्याच्या प्लेटची किंमत 10 रुपये होती. त्यावेळी रोज वीस ते तीस प्लेटची विक्री देखील होत होती. मात्र आता याच धिरड्यांच्या फ्लॅट ची किंमत 30 रुपये झाली असून दररोज 150 ते 200 प्लेटची विक्री होते. धिरडं, गावरान शेंगदाण्याची तयार केलेली तिखट चटणी आणि कांदा हे येथील कॉम्बिनेशन चांगलंच हिट झालंय.
advertisement
5/5
नितिन गडगिळे यांनी यावेळी घरगुती धिरडे तयार करण्याची रेसिपीही सांगितली आहे. डाळीचे पीठ घरगुती तयार केलेला लाल, काळा, मसाला आणि यासह या धिरड बनवण्यासाठी शेंगदाण्याचे तेल देखील वापरले जाते आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करत त्यामध्ये काही प्रमाणात कोथिंबीर टाकली जाते. त्यानंतर तव्यावर तेल टाकून हे पीठ टाकलं की तयार होतं गरमागरम अस्सल घरगुती धिरडे तयार होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
मसाला डोसा आता विसरा, अस्सल घरगुती मसाल्यांपासून तयार केलेला हा पदार्थ खाऊन पाहाच