एकाच ठिकाणी घ्या 15 प्रकारच्या खाकऱ्याचा आस्वाद; एकदा खाल तर पुन्हा याल
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यात याठिकाणी खाकरा हा 15 प्रकारमध्ये मिळतो.
advertisement
1/5

पुण्याची खाद्य संस्कृती तर प्रसिद्ध आहेच परंतु बाहेरील राज्यातील असलेले पदार्थ देखील पुण्यात तेवढेच प्रसिद्ध आहेत. खाकरा हा प्रामुख्याने गुजरात राज्यात बनवला जातो. आपण मसाला पापड बनवतो त्याच पद्धतीने तो बनवला जातो.
advertisement
2/5
परंतु हा खाकरा आरोग्यासाठी अतिशय हेल्दी फूड असा आहे आणि हे कधी ही खाऊ शकता असा आहे. यामध्ये देखील अनेक प्रकारचे फ्लेवर्स पाहिला मिळतात. आज आपण पाहणार आहोत की खाकरा हा नेमकं कसा बनवला जातो. <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> हा खाकरा कुठे मिळतो.
advertisement
3/5
पुण्यात जोशी फूड मार्ट या नावाने एक दुकान आहे. याठिकाणी दत्तात्रय जोशी हे खाकरा विकतात. याठिकाणी खाकरा हा 15 प्रकारमध्ये मिळतो. यामध्ये मसाला, चीझ, सॅलईड पाणीपुरी, चोरा पुल्ली, मेथी, पावभाजी, कोथिंबीर, साधा पंजाबी मसाला जिरा, चाट मसाला, पेरिपेरी, चणा जोर असे विविध प्रकार पाहिला मिळतात. या ठिकाणी खाकरा खाण्यासाठी मोठी गर्दी पाहिला मिळते.
advertisement
4/5
खाकरा हा गव्हाचे पीठ, तेल आणि विविध मसाल्यांचा वापर करून बनवला जातो. मसाला खाकरावर आधी शेजवान चटणी लावतो. मग त्यानंतर कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर आणि लिंबू पिळतो वरून याला हिरवी चटणी टोमॅटो चटणी पण असते. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आम्ही उपलब्ध करून देत असतो. म्हणजे प्लेन खाकरा असेल तर टोमॅटो, कांदा घालून देतो.
advertisement
5/5
जी कडधान्य आहेत मटकी, हरभरा घालून पण खाकरा तयार करतो. यामध्ये मुख्य चार प्रकार आहेत तो म्हणजे साधा, मसाला, चिझ्झ,कडधान्य आणि लोकांच्या आवडी प्रमाणे फ्लेवर्स पण बनवून देतो. यापासून कुठलाही त्रास होत नाही डायट म्हणून किंवा हायप्रोटीन म्हणून पण खाऊ शकता,असं दत्तात्रय जोशी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
एकाच ठिकाणी घ्या 15 प्रकारच्या खाकऱ्याचा आस्वाद; एकदा खाल तर पुन्हा याल