Skin Care Tips : सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी चेहऱ्यावरचे केस करताय शेव्ह? महिलांसाठी आहेत 'या' खास टिप्स
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सध्याच्या काळात, चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी शेविंग करणे हा महिलांमध्ये एक लोकप्रिय उपाय बनला आहे. यामुळे त्वचा खूप गुळगुळीत होते आणि मेकअप अधिक चांगला दिसतो. पण, चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्यास त्वचेला जळजळ किंवा पुरळ येऊ शकते.
advertisement
1/7

सध्याच्या काळात, चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी शेविंग करणे हा महिलांमध्ये एक लोकप्रिय उपाय बनला आहे. यामुळे त्वचा खूप गुळगुळीत होते आणि मेकअप अधिक चांगला दिसतो. पण, चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्यास त्वचेला जळजळ किंवा पुरळ येऊ शकते. चेहऱ्यावरील संवेदनशील त्वचेची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
2/7
योग्य रेझरची निवड: सामान्य रेझर वापरण्याऐवजी, खास चेहऱ्यासाठी बनवलेले छोटे आणि तीक्ष्ण ब्लेड असलेले रेझर फेशियल रेजर वापरा. हे रेझर त्वचेला कमी नुकसान पोहोचवतात आणि लहान केसांसाठी प्रभावी असतात.
advertisement
3/7
त्वचेची तयारी: शेविंग करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील तेल आणि धूळ निघून जाते. स्वच्छ त्वचेवर शेविंग केल्यास संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
advertisement
4/7
लुब्रिकेशनसाठी जेलचा वापर: त्वचेला कोरडी असताना शेविंग करू नका. यामुळे जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. शेविंग करण्यापूर्वी चेहऱ्यावर शेविंग जेल, फोम किंवा नारळाचे तेल लावा, ज्यामुळे रेझर सहजपणे सरकेल.
advertisement
5/7
योग्य दिशेने शेविंग: चेहऱ्यावर केस ज्या दिशेने वाढत आहेत, त्याच दिशेने हळूवारपणे रेझर चालवा. विरुद्ध दिशेने शेविंग केल्यास त्वचेवर पुरळ आणि इनग्रोन हेअर्स येऊ शकतात.
advertisement
6/7
शेविंगनंतरची काळजी: शेविंग झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. टॉवेलने चेहरा घासून पुसू नका, फक्त हळूवारपणे टॅप करून पुसा. नंतर त्वचेला शांत करण्यासाठी ॲलोवेरा जेल किंवा कोणताही अल्कोहोल-फ्री मॉइश्चरायझर लावा.
advertisement
7/7
गैरसमज दूर करा: शेविंग केल्याने केस जाड किंवा गडद वाढतात, हा एक गैरसमज आहे. शेविंग केल्याने केसांची फक्त वरची टोक कापली जाते, त्यामुळे त्यांचा रंग किंवा जाडी बदलत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी चेहऱ्यावरचे केस करताय शेव्ह? महिलांसाठी आहेत 'या' खास टिप्स