TRENDING:

Toothpaste : टूथपेस्टवरील कलर कोडचं सत्य अखेर समोर; 99 टक्के लोकांना या मार्कबद्दल चुकीचा समज

Last Updated:
दात खराब झाले तर खाणं-पिणं कठीण होतं आणि त्याचा थेट परिणाम शरीराला मिळणाऱ्या पोषणावर होतो. म्हणून दात निरोगी असतानाच त्यांची योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
advertisement
1/7
टूथपेस्टवरील कलर कोडचं सत्य अखेर समोर; 99 टक्के लोकांना या मार्कबद्दल चुकीचा समज
आजच्या डिजिटल जगात आपण रोज टीव्ही, युट्युब किंवा सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती पाहातो आणि त्या पाहून टूथपेस्टसारख्या दैनंदिन वस्तूही ब्रँडनुसार निवडतो. पण दातांच्या आरोग्याबद्दल एक साधं सत्य आपण विसरतो. दातांची योग्य काळजी घेतली नाही तर ते वेळेआधीच खराब होतात. दात खराब झाले तर खाणं-पिणं कठीण होतं आणि त्याचा थेट परिणाम शरीराला मिळणाऱ्या पोषणावर होतो. म्हणून दात निरोगी असतानाच त्यांची योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
advertisement
2/7
आपण रोज सकाळ-संध्याकाळ पेस्ट वापरून दात घासतो. बाजारातही विविध ब्रँडचे, विविध फ्लेवर्सचे टूथपेस्ट उपलब्ध आहेत. पण गेल्या काही वर्षांत एक गोष्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली. टूथपेस्ट ट्यूबच्या तळाशी असलेले रंगीत चौकोन नेमकं काय सांगतात?
advertisement
3/7
रंगांबद्दल अनेक दावे, पण खरं काय?अनेक पोस्ट्स आणि फॉरवर्ड मेसेजमध्ये असा दावा केला जातो की टूथपेस्ट ट्यूबच्या तळाशी असलेल्या निळ्या, लाल, हिरव्या किंवा काळ्या चौकोनांचा संबंध पेस्टच्या घटकांशी आहे.
advertisement
4/7
निळा रंग - नैसर्गिक पदार्थ + औषध/रसायनलाल रंग - नैसर्गिक पदार्थ + काही रसायनहिरवा रंग - पूर्णतः नैसर्गिककाळा रंग - पूर्णतः रासायनिक
advertisement
5/7
पण या सर्व दाव्यांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कोणतीही अधिकृत संस्था, संशोधन किंवा कंपनी याला मान्यता देत नाही.
advertisement
6/7
मग हे रंग कशासाठी असतात?रिपोर्टनुसार, हे रंग फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेतील मशीन रीडिंगसाठी असतात. ट्यूबला कुठून कापायचं, कशी सील करायची, मशीनला कोणती गाइडलाइन द्यायची. हे दाखवण्यासाठी हे मार्क असतात. यांचा टूथपेस्टच्या घटकांशी कुठलाही संबंध नसतो.
advertisement
7/7
मग आपल्याला काय करायला हवं?बहुतेक टूथपेस्टचे बेसिक घटक जवळपास सारखेच असतात. पण तरीही आपल्याला टूथपेस्ट आपल्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यानुसार निवडायला हवी. सेंस्टिव्हिटी, कॅव्हिटी, गम प्रॉब्लेम्स प्रश्न काहीही असो, योग्य पेस्ट निवडणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Toothpaste : टूथपेस्टवरील कलर कोडचं सत्य अखेर समोर; 99 टक्के लोकांना या मार्कबद्दल चुकीचा समज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल