आता हिटरच घ्यावाच लागणार, हाडं गोठवणारी थंडी वाढणार; पश्चिम महाराष्ट्रात आणखी पारा घसरणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर भारतातील थंडीमुळे महाराष्ट्रात गुलाबी गारठा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत थंडी सौम्य, तर विदर्भ, मराठवाड्यात कडाक्याची थंडी. पाऊस नाही, तापमान स्थिर.
advertisement
1/5

उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात गारठा राहणार आहे. 18 डिसेंबरपर्यंत गारठा कायम राहिली. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील लोकांना गुलबी थंडी तर ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबईत थंडी जरा जास्त राहील. तर विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी राहणार आहे. असं असलं तरी दिवसा मात्र कमाल तापमानातही कमालीची वाढ होत आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्राचे आकाश मुख्यत्वे स्वच्छ आणि निरभ्र राहील. दिवसा राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान २७°C ते २९°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या कमाल तापमानामुळे दिवसा चांगली ऊब अनुभवायला मिळेल आणि दैनंदिन कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
3/5
संपूर्ण मध्य भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला आहे, त्यानुसार आगामी सात दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. विशेषतः पुणे, नाशिक आणि मुंबईजवळील ग्रामीण भागात रात्रीचा पारा १३°C च्या आसपास टिकून राहील। सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत या गुलाबी थंडीची मजा अनुभवायला मिळेल.
advertisement
4/5
तज्ज्ञांचा अंदाज आहे की, पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहील आणि त्यानंतर मात्र २ ते ३ अंश सेल्सिअसने किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. जेऊर, धुळे, निफाड, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा जास्तच खाली उतरला आहे.
advertisement
5/5
मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर आज सकाळी हलका गारवा जाणवेल. मात्र किमान तापमान साधारण 20 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील. सोमवारच्या तुलनेत किमान तापमानात 1 अंशाने वाढ दिसून आली आहे. पुढील दोन दिवसांतही या भागात हवामान साधारण असंच राहणार असून थंडी वाढण्याची चिन्हे नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आता हिटरच घ्यावाच लागणार, हाडं गोठवणारी थंडी वाढणार; पश्चिम महाराष्ट्रात आणखी पारा घसरणार