TRENDING:

OTT Releases This Week : माधुरीची 'मिसेज देशपांडे' ते रश्मिकाची 'थामा'; या आठवड्यात ओटीटीवर काय-काय पाहाल?

Last Updated:
OTT Releases This Week : 15 ते 21 डिसेंबरदरम्यान ओटीटीवर अनेक नवीन फिल्म आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. त्यामुळे ओटीटीप्रेमींना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.
advertisement
1/7
OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर काय-काय पाहाल?
एक दीवाने की दीवानियत (Ek Deewane Ki Deewaniyat) : हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा 'एक दीवाने की दीवानियत' ही फिल्म या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही रोमँटिक फिल्म 16 डिसेंबरपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या फिल्मने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
advertisement
2/7
द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा सीझन 20 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर सुरू होत आहे. या नव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा पाहुणी म्हणून येणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा सुरू होत असल्याने प्रेक्षकांना कॉमेडी आणि एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोज मिळणार आहे.
advertisement
3/7
मिसेज देशपांडे (Mrs Deshpande) : माधुरी दीक्षित अभिनीत 'मिसेज देशपांडे' ही थ्रिलर सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही सायकोलॉगिकल थ्रिलर सीरिज 19 डिसेंबरपासून प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल. या सीरिजमध्ये माधुरीचा पहिल्यांदाच सीरियल किलर अंदाज पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
थामा (Thamma) : आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा 'थामा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर आता ही फिल्म ओटीटीवर रिलीज होत आहे. 16 डिसेंबरपासून प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही फिल्म पाहता येईल.
advertisement
5/7
रात अकेली है बंसल मर्डर्स (Raat Akeli Hai The Bansal Murders) : नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'रात अकेली है बंसल मर्डर्स' ही क्राइम, थ्रिलर फिल्म प्रेक्षकांना 19 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. हनी त्रेहन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
6/7
फोर मोर शॉट्स प्लिज सीझन 4 (Four More Shots Please 4) : दामिनी, अंजना, उमंग आणि सिद्धी यांची 'फोर मोर शॉट्स प्लिज सीझन 4' ही फिल्म 19 डिसेंबरपासून प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. चार मैत्रिणींची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
advertisement
7/7
दाऊद (Daud) : दाऊद ही क्राइम-कॉमेडी-थ्रिलर फिल्म आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 19 डिसेंबरपासून ही फिल्म प्रेक्षकांना से लायंसगेट प्ले ओटीटीप्लेवर पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Releases This Week : माधुरीची 'मिसेज देशपांडे' ते रश्मिकाची 'थामा'; या आठवड्यात ओटीटीवर काय-काय पाहाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल