पोटासाठी शेती, जीवासाठी बंदूक; बळीराजाच्या हातात नांगराऐवजी गन; डोळ्यात अंजन घालणे भयावह वास्तव
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
advertisement
1/7

उत्तर पुणे, नगर हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून त्याच्या दहशतीन ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र आहे. आता या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत.
advertisement
2/7
काही गावात महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टाच घातलाय. शेती हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय.
advertisement
3/7
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या धास्तीने दिवसाही शेतात काम करणे अवघड झाले आहे.राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार यांच्या शेतात कांद्याची लागवड करताना चक्क बंदूक घेऊन त्यांना मजुरांची सुरक्षा करत पहारा द्यावा लागत आहे.
advertisement
4/7
शेतात चक्क बंदूक घेऊन शेतकऱ्याचे व्हिडीओ, फोटो हे सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले असून अनेकांना जिव गमवावा लागला आहे .
advertisement
5/7
बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूरही मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मजूरांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहे.
advertisement
6/7
राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार चक्क बंदूक घेऊन मजूरांच्या सुरक्षेसाठी शेतात पहारा देत आहेत. आम्ही शेती करायची की जीव वाचवायचा ? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे
advertisement
7/7
राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं बळीराजावर हातात बंदूक घेण्याची वेळ आली आहे आणि हे खरंच लाजिरवाणे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पोटासाठी शेती, जीवासाठी बंदूक; बळीराजाच्या हातात नांगराऐवजी गन; डोळ्यात अंजन घालणे भयावह वास्तव