Amaravati : समाजाने नाकारलेल्याच्या आयुष्यातील अंधार करतात दूर, 17 व्या वर्षापासून सुरू आहे कार्य, तुम्ही कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीमधील तपोवन परिसरात विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष सुभाष गवई हे या ठिकाणी वयाच्या 17 व्या वर्षापासून कार्य करत आहेत. तेथील रुग्णांच्या जखमा धुण्यापासून ते कार्य करतात.
advertisement
1/7

अमरावतीमधील तपोवन परिसरात विदर्भ महारोगी सेवा मंडळ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष सुभाष गवई हे या ठिकाणी वयाच्या 17 व्या वर्षापासून कार्य करत आहेत. समाजाने नाकारलेल्या घटकांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणे. त्यांच्या जखमा धुणे. त्यांच्या आयुष्यातील अंधार कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे. हे काम ते गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत. संस्थेत असणारे प्रत्येक रुग्ण हे मला माझ्या आई-वडिलांप्रमाणे आहेत, असेही ते सांगतात.
advertisement
2/7
विदर्भ महारोगी सेवा मंडळ अमरावती तपोवनचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, मी 17 वर्षाचा असताना या संस्थेत आलो होतो. तेव्हा NCC च्या माध्यमातून याठिकाणी आलो आणि येथील लोकांसोबत माझी नाळ जुळली.
advertisement
3/7
वयाच्या 17 व्या वर्षी तपोवनमधील रुग्णांची पहिली जखम धुण्याचे भाग्य मला लाभलं. तेव्हा विचार आला की, या लोकांच्या आयुष्यात किती अंधार आहे. समाजाने नाकारलेला घटक आहे. यांच्यासाठी दाजीसाहेब पटवर्धन काम करत आहेत. महात्मा गांधी यांचा वसा ते पुढे नेत आहेत. ते जर कर्नाटक मधून येत येऊन कार्य करू शकतात. तर आपण सुद्धा आपले योगदान यात द्यायला पाहिजे. तेव्हापासून या संस्थेत मी काम करत आहे.
advertisement
4/7
बारावीला असताना सुरू केलेलं काम अजूनही मी करत आहे. कुष्ठरोगांच्या जखमा धुणे, त्यांना सावरणे, धीर देणे या कामासोबतच नंतर मी अंध आणि दिव्यांग लोकांसाठी सुद्धा काम करायला सुरुवात केली. येथील कित्येक बहिणींचे लग्न लावून दिले. त्यांना शिक्षणात मदत केली. असेच माझे नवनवीन कामे सुरू होती. आयुष्यातील 45 वर्ष मी या लोकांच्या सेवेत घालवली. अजूनही ते काम सुरूच आहे.
advertisement
5/7
या माझ्या माय-माऊलीसाठी काम करत असताना मी कोणाकडूनही रुपयाची अपेक्षा ठेवली नाही. शिक्षण सुरू असताना सुद्धा मी हे काम केलं. त्यानंतर माझी नोकरी सांभाळून सुद्धा काम केलं. दिवसाला 5 ते 6 तास वेळ मी येथील लोकांना देतो. त्यामुळे त्यांना मिळणारा आनंद हाच माझा मोबदला असतो.
advertisement
6/7
माझे हेच काम बघून गेले 18 महिन्यांपासून मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतो आहे. तेव्हापासून येथे असणाऱ्या 650 रुग्णांना कसं सांभाळायचं. यांची ट्रीटमेंट, पुनर्वसन याबाबत सुद्धा नवनवीन प्लॅनवर काम सुरू आहे.
advertisement
7/7
यासर्व प्रवासात मला अमरावतीकरांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्या त्या कौतुकाच्या थापेमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. अजूनही या लोकांच्या सेवेसाठी होईल ते प्रयत्न मी करत आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अमरावती/
Amaravati : समाजाने नाकारलेल्याच्या आयुष्यातील अंधार करतात दूर, 17 व्या वर्षापासून सुरू आहे कार्य, तुम्ही कराल कौतुक