TRENDING:

तो पुन्हा येणार! मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट

Last Updated:
राज्यात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
1/5
तो पुन्हा येणार! मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट
राज्यातील हवामानात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच राज्यातील विविध भागात पावसाच्याही जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याचे दिसत आहे.
advertisement
2/5
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा मराठवाड्यातील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
advertisement
3/5
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पाऊस होईल. तर बीड व जालना या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचे चटके वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 33 अंशांवर गेले आहे. शहरामध्ये उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
advertisement
5/5
परतीच्या पावसाने मराठवाड्यात पुन्हा हजेरी लावलीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगमातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. तर ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना फळबागांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तो पुन्हा येणार! मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल