ताडोबाचा राजा परतला! धुमाकूळ घालताना दिसला छोटा मटका, वर्चस्वाच्या लढाईनंतर झाला होता गायब
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
जखमी झालेला ताडोबाचा राजा गेल्या 4 महिन्यांपासून गायब होता. मात्र, आता छोटा मटका पुन्हा धुमाकूळ घालताना पर्यटकांना दिसला आहे.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/maharashtra/nagpur/">नागपुरातील</a> ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वर्चस्वावरून वाघांच्या लढाया होत असतात. 3-4 महिन्यांपूर्वी अशाच एका लढाईत ताडोबाचा राजा म्हणून ओळखला जाणारा वाघ छोटा मटका गंभीर जखमी झाला होता.
advertisement
2/7
जखमी झालेला ताडोबाचा राजा गेल्या 4 महिन्यांपासून गायब होता. मात्र, आता छोटा मटका पुन्हा धुमाकूळ घालताना पर्यटकांना दिसला आहे.
advertisement
3/7
विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून गायब असणारा ताडोबाचा राजा तंदुरुस्त होऊन परतला आहे. या वाघाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक जंगल सफारी करत ताडोबात येतात.
advertisement
4/7
छोटा मटका सोबत भानुशाखिंडी, झरनी आणि बबली या वाघिणी देखील होत्या. त्यांनी एकूण 9 शावकांना जन्म दिला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांच्या संख्येत वाढ होणार आहे.
advertisement
5/7
लढाईनंतर छोटा मटका दिसला नाही. काही महिन्यांनंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे, असे वन्यजीव अभ्यासक पियुष आक्रे यांनी सांगितले.
advertisement
6/7
आता वाघ जंगलात आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी पद चिन्हांकित करताना दिसला. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांनी हे विलक्षण दृश्य पाहिले.
advertisement
7/7
दरम्यान, छोटा मटका पुन्हा एकदा ताडोबात परतल्याने पर्यटकांनाही आनंद झाला आहे. त्याला पाहण्यासाठी ताडोबातील गर्दी वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
ताडोबाचा राजा परतला! धुमाकूळ घालताना दिसला छोटा मटका, वर्चस्वाच्या लढाईनंतर झाला होता गायब