TRENDING:

Vidarbha Weather: विदर्भातील या जिल्ह्यांत उष्णतेची लाट! 48 तासांत पाऊस? आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून तापमानाचा पारा चाळीशी पार आहे. आज पुन्हा उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
विदर्भातील या जिल्ह्यांत उष्णतेची लाट! 48 तासांत पाऊस? आजचा हवामान अंदाज
मार्च महिन्यात राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आहे. बहुतांश जिल्ह्यात आज देखील तापमानाचा पारा चाळीशी पार राहणार आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
2/7
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि अकोल्यात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. तर बहुतांश जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे.
advertisement
3/7
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. पुढील 24 तासांत नागपूरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांनी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
4/7
वर्धा, अमरावती आणि अकोल्यातील कमाल तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर पुढील 2 दिवसांत हवापालट होऊन अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/7
चंद्रपूरमध्ये उष्णतेचा पारा सर्वाधिक असून आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 41 अंशांवर राहण्याची शक्यता असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. सोमवारी देखील चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. तर गोंदिया आणि बुलढाण्यात कमाल तापमान 37 अंशांवर राहील.
advertisement
6/7
यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 39 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. यवतमाळ मध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून 17 मार्चला देखील हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
Weather Report: महाशिवरात्रीला सूर्यदेवाचंदरम्यान, विदर्भात गेल्या काही दिवसांत उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या 2 दिवसांत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.रौद्र रूप, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके, आजचा हवामान अंदाज
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather: विदर्भातील या जिल्ह्यांत उष्णतेची लाट! 48 तासांत पाऊस? आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल