Vidarbha Weather Update: विदर्भातून पाऊस गायब; आता पुन्हा थंडीचा जोर? हवामानाबाबत महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
29 डिसेंबरला विदर्भात सामान्यतः धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचे वातावरण होते. विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाल्याची माहिती आहे. विदर्भातही हिच स्थिती बघायला मिळाली.
advertisement
2/5
विदर्भात 27 डिसेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर आज 29 डिसेंबरला अवकाळी पाऊस गायब होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.विदर्भात आज सामान्यतः धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे.
advertisement
3/5
विदर्भात आज कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून धुके पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
4/5
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पुढील काही दिवसांत किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान 18 अंश, तर चंद्रपूरमध्ये 20 अंश सेल्सिअस राहणार असून धुक्यासह आकाश ढगाळ राहील. वाशिममध्ये देखील हवामानाची हीच स्थिती जाणवणार आहे.
advertisement
5/5
विदर्भातून अवकाळी पाऊस गायब झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र, पुढील काही दिवसांत थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पाऊस, थंडी आणि ढगाळ वातावरण या तिन्हीमुळे शेतकरी पुन्हा संकटात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather Update: विदर्भातून पाऊस गायब; आता पुन्हा थंडीचा जोर? हवामानाबाबत महत्त्वाचं अपडेट