विदर्भात जोरधार! पुढील काही दिवस पावसाचे, शेतकऱ्यांची चिंता वाढली
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. विदर्भात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
advertisement
1/5

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटमुळे उष्णतेचा पारा चढत आहे. अशातच पुन्हा परतीचा सक्रीय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाला सामोरं जावं लागतंय. तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे..
advertisement
2/5
राज्यात 8 ऑक्टोबर पासून तुरळक ठिकाणी पाऊस सक्रिय झाल्याने उष्णतेचा पारा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. विदर्भात 9 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.
advertisement
3/5
आज 10 ऑक्टोबरपासून विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ,गडचिरोली, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/5
9 ऑक्टोबरला विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.. अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला फटका बसलाय. काढणीला आलेलं सोयाबीन पुन्हा एकदा संकटात आहे.
advertisement
5/5
आधीच्या पावसाने सुद्धा सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला पावसामुळे कोंब आले आहेत. शेतकऱ्यांना हलक्या पावसाची प्रतीक्षा होती पण पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात जोरधार! पुढील काही दिवस पावसाचे, शेतकऱ्यांची चिंता वाढली