TRENDING:

विदर्भात जोर वाढणार! हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट, पुढचे 5 दिवस पावसाचे

Last Updated:
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. विदर्भात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
विदर्भात जोर वाढणार! हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट, पुढचे 5 दिवस पावसाचे
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल होतांना दिसून येत आहे. या बदलाचा परिणाम सरळ मानवी आरोग्यावर होत आहे. काही ठिकाणी कडाक्याचे उन तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बघायला मिळत आहे. विदर्भात 3 दिवसांपूर्वी उष्णतेचा पारा हा 30 अंश पार गेला होता.
advertisement
2/5
आताही काही ठिकाणी तशीच परिस्थिती आहे. विदर्भात ऑक्टोबर हीट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशातच थोडा दिलासा म्हणून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याचे चित्र आहे. गुरुवारला विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
advertisement
3/5
आज 11 ऑक्टोबर रोजी सुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
advertisement
4/5
उर्वरित जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांत हलका सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. गुरुवारी अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. त्यामुळे कपाशी पिकाला पोषक तर सोयाबीन पिकाला घातक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
5/5
सध्या कापूस उत्पादक शेतकरी हलक्या ते मध्यम पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी पावसाच्या अंदाजाने चिंतेत आहे. विदर्भात 17 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीला वेग आलाय. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात जोर वाढणार! हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट, पुढचे 5 दिवस पावसाचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल