Raj Thackeray : असं काय घडलं ज्यामुळे राज ठाकरे टोलनाक्यावर उभे राहिले? आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, Photo
- Published by:Shreyas
Last Updated:
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेच्या ट्रॅफिकचा त्रास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही सहन करावा लागला आहे. पुण्याहून मुंबईला येत असताना राज ठाकरे टोलनाक्यावर थांबले आणि त्यांनी टोल कर्मचाऱ्याला सज्जड दम भरला.
advertisement
1/5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरच्या भीषण ट्रॅफिकचा अनुभव आला. पिंपरी चिंचवडमध्ये 100व्या नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे एक्स्प्रेस हायवेवरून मुंबईच्या दिशेने जात होते, त्यावेळी खालापूर टोलनाक्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
advertisement
2/5
जवळपास 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर स्वत: राज ठाकरे टोलनाक्यावर उतरले. यानंतर त्यांनी अडकलेल्या ऍम्ब्युलन्सला रस्ता करून दिला.
advertisement
3/5
राज ठाकरे यांनी टोलनाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला बाहेर बोलावलं आणि त्याला सज्जड दम दिला. पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडकली तरी याद राखा. कुठपर्यंत ट्राफीक आहे ते माहिती आहे का? असा इशारा राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्याला दिला.
advertisement
4/5
राज ठाकरे यांच्या मनसेने याआधीही टोलच्या प्रश्नावरून अनेकवेळा आंदोलनं केली आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल प्रश्नावरून आक्रमक होत महामार्गांवरचे टोलही फोडले आहेत.
advertisement
5/5
काहीच दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग आणि मुलुंड टोलनाक्यावरूनही मनसेने आक्रमक आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी टोलनाके फोडले आणि कंत्राटदाराच्या कार्यालयावरही हल्ला केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Raj Thackeray : असं काय घडलं ज्यामुळे राज ठाकरे टोलनाक्यावर उभे राहिले? आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, Photo