TRENDING:

Weather Update: महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 8 दिवस गारठाच

Last Updated:
मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, सुप्रित कुमार यांच्या मते पुढील 8 दिवस थंडी कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट.
advertisement
1/5
महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 8 दिवस गारठाच
मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. १० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला होता. मागच्या 24 तासांत तापमानात रात्री जास्त घसरण झाली आहे. हवामान तज्ज्ञ सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित 8 दिवस हे थंडीचे असणार आहेत.
advertisement
2/5
परभणी, धुळे, निफाड, अहिल्यानगर, जेऊर, गोंदिया या जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा एकदा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/5
उत्तरेकडून भारताच्या दिशेनं थंड वारे वाहात आहेत. तर दुसरीकडे दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. 3-5 डिग्रीपर्यंत तापमानात घट होणार आहे. दिवसा तापमान स्थिर राहणार आहे.येत्या नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार आहे.
advertisement
4/5
महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढचे दोन दिवस 3 डिग्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. नव्या वर्षातही थंडीच्या लाटेचा इशारा कायम राहणार आहे. ला निनामुळे यंदा थंडी कायम राहणार आहे.
advertisement
5/5
मुंबईसह उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतही गारठा जास्त वाढला आहे.१५ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली होती. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ६ ते ९ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गारठा वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 8 दिवस गारठाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल